![]()
कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील लाखो शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य अंग असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका व बीजगुणन केंद्र या कार्यालयांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने ही तिन्ही कार्यालये दुर्गम बेट
.
अनिल सिरसाठ, कडूबा पवार, प्रविण काशिनंद, प्रल्हाद लोखंडे, अंकुश सोनवणे, बाळकृष्ण पगारे, धिरज नगराळे, आकाश बोलधने या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी शामराव वाकळे, संदीप शिरसाट यांना याबाबत निवेदन दिले. कन्नड कृषी अधिकारी कार्यालयासाठी १५२ एकर जमीन ब्राह्मणी गराडा शिवारात आहे. याच ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका, बीजगुणन केंद्र आहे. कन्नड शहरापासून चार किलोमीटर अंतरावर हे कार्यालय आहे. मात्र या तिन्ही कार्यालयांकडे जाण्यासाठी पक्का रस्ताच नाही. हा रस्ता मुरूम व मातीचा आहे. रस्त्यात एक मोठा ओढा आहे. त्यावर नळकांडी पूल होता. दोन वर्षांपूर्वी पावसाने आलेल्या पुरात तो वाहून गेला. पावसाळ्यात कृषी विभाग, जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका, बीजगुणन केंद्र या कार्यालयांचा व नागरिकांचा संपर्क तुटतो. कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक व या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांन ा चार किलोमीटर अंतरावर वाहने लावावी लागतात. चिखलातून ये-जा करावी लागते. गेल्या दहा वर्षांपासून कन्नड ते कृषी विभाग कार्यालय रस्ता व्हावा म्हणून अनेक जनआंदोलने झाली. तत्कालीन कृषी मंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी, आमदार यांनी स्थळ पाहणी करून आश्वासने दिली. तरीही या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही. विद्यमान आमदार संजना जाधव यांनी पालकमंत्री संजय सिरसाठ यांच्या मार्फत जिल्हा नियोजन निधीतून या ठिकाणी सिमेंट पूल, रस्ता व इतर कामांसाठी २ कोटी २० लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. मात्र पावसाळा केवळ एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. तरीही पूल व रस्त्याच्या कामाचा मुहूर्त लागलेला नाही.
हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या कामासाठी जिल्हा नियोजन विभागाने निधी मंजूर केला आहे. लवकरच या कामास सुरुवात होईल, असे खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर निकम यांनी सांगितले.
संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू कृषी विभाग, जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका, बीजगुणन केंद्र हे कार्यालये एकाच ठिकाणी आहेत. मात्र रस्ता नसल्याने अधिकारी, कर्मचारी, शेतकरी यांना दळणवळण करणे जिकिरीचे झाले आहे. शेतकरी आम्हाला दररोज जाब विचारतात,काम मंजूर आहे पण अद्याप कार्यारंभ का नाही, याचा संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू असून चौकशी करून सांगतो. -संदीप शिरसाट, तालुका कृषी अधिकारी