Headlines

50 वर्षांनंतर चितेगाव-चेहेडी शिव रस्ता खुला:शेतकऱ्यांसाठी वाहतुकीचा मार्ग झाला अतिक्रमणमुक्त; प्रशासनाच्या कारवाईचे स्वागत‎




निफाड तालुक्यातील चितेगाव-चेहेडी दरम्यानचा तब्बल ५० वर्षांपासून बंद असलेला शिव रस्ता अखेर अतिक्रमण हटवून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. शुक्रवारी (दि. १५) महसूल प्रशासन, भूमी अभिलेख विभाग आणि ग्रामस्तरावरील अधिकाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, उपाधीक्षक, भूमी अभिलेख राजेंद्र भाबड यांच्या आदेशानुसार ही मोहीम राबविण्यात आली. मंडळ अधिकारी जयंत लिलके यांनी संबंधित शेतकऱ्यांची पूर्वबैठक घेऊन रस्त्याचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर शशिकांत बैरागी (भूमी अभिलेख, निफाड) यांनी रस्त्याच्या हद्दी व खुणा निश्चित केल्या. यानंतर सुमारे १ किलोमीटर लांबीचा व ९ मीटर रुंदीचा चितेगाव-चेहेडी शिव रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यात आला. अनेक दशकांपासून बंद असलेला हा रस्ता खुला झाल्याने शेतकऱ्यांची शेतीमाल वाहतूक, शेतीकामासाठीची ये-जा आणि ग्रामसंपर्क अधिक सुलभ होणार आहे. या मोहिमेत ग्राम महसूल अधिकारी शेखर पाटील, अबोली साळवे, कैलास अहिरे, पूर्वा राठोड, पोलिस हवालदार जाधव, संबंधित ग्रामपंचायत अधिकारी तसेच तंटामुक्ती अध्यक्ष दशरथ रूमणे यांनी सक्रिय सहकार्य केले. यावेळी चितेगाव आणि चेहेडी येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आता गैरसोय दूर होणार गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला चितेगाव-चेहेडी शिव रस्ता प्रशासनाने समन्वयातून अतिक्रमणमुक्त करून खुला केला, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार असून ग्रामीण भागातील विकासाला गती मिळेल. प्रशासनाने लोकहिताचा निर्णय घेतल्याबद्दल सर्व संबंधित अधिकारी आणि ग्रामस्थांचे आभार. – आमदार दिलीप बनकर, निफाड



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *