![]()
नाशिक जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचे रेल्वे जंक्शन असलेल्या मनमाड स्थानकावर आता मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ला (गाडी क्र. 22223३/22224) अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. केंद्र सरकारने या मागणीला मंजुरी दिल्यामुळे मनमाड आणि परिसरातील प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्राद्वारे या निर्णयाची माहिती दिली आहे. यापूर्वी या थांब्याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता, ज्याची दखल घेत रेल्वे मंत्रालयाने मनमाड जंक्शनवर वंदे भारत एक्सप्रेसच्या थांब्याला मंजुरी दिली आहे. प्रवाशांना मिळणार आधुनिक प्रवासाची सुविधा: मनमाड हे उत्तर व दक्षिण भारताला जोडणारे प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. या निर्णयामुळे मनमाडसह आसपासच्या ग्रामीण व शहरी भागातील व्यापारी, नोकरदार, नागरिक आणि शिर्डीकडे जाणाऱ्या भाविकांना आता अतिशय वेगाने आणि सोयीस्करपणे प्रवास करता येणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. (बातमी अपडेट होत आहे…)
Source link
मनमाडकरांना मोठा दिलासा!:मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला मनमाड जंक्शनवर अधिकृत थांबा मंजूर