Headlines

लातूरमध्ये तरुणाला नग्न करून बेदम मारहाण:पार्श्वभागात पेट्रोल टाकून अमानुष छळ; पोलिसांकडून एकाला अटक, इतरांचा शोध सुरू




लातूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाला नग्न करून त्याला पट्ट्याने आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे तर, अमानुषतेची सर्व हद्द पार करत या तरुणाच्या पार्श्वभागात पेट्रोल टाकल्याचा भयंकर प्रकारही समोर आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण लातूर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या मारहाणीचा संपूर्ण थरार आरोपींनी स्वतःच्या मोबाईलमध्ये चित्रित केला. मारहाण करणाऱ्या या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यानेच नंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावरील विविध ग्रुप्सवर व्हायरल केला. हा अत्यंत विचलित करणारा व्हिडिओ समोर आल्यानंतरच या भयंकर गुन्ह्याला वाचा फुटली आणि हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. या गंभीर घटनेची दखल घेत स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. मात्र, या गुन्ह्यात सामील असलेले अन्य तीन ते चार आरोपी अद्याप फरार असून, पोलिस पथके त्यांचा कसून शोध घेत आहेत. प्राथमिक माहितीनुसार, मारहाणीची ही अमानुष घटना काही महिन्यांपूर्वी घडली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र, या तरुणाला मारहाण करण्यामागचे नेमके कारण काय, ही घटना नेमकी कधी घडली आणि आताच हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागचा आरोपींचा उद्देश काय होता, याचा सखोल तपास सध्या पोलीस करत आहेत. या भयंकर प्रकारामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *