Headlines

चिंचखेडा बु. येथे सीआरटी प्रात्यक्षिक, जनजागृती मोहीमेची बैठक उत्साहात:कि़डींच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळवण्याचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन‎‎




कन्नड तालुक्यातील चिंचखेडा बु. येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत शुक्रवारी सीआरटी प्रात्यक्षिक व जनजागृती मोहिम उत्साहात पार पडली. यावेळी शेतकऱ्यांना सांगण्यात आले की, मे व जून महिन्यात पिकणाऱ्या कडुलिंबाच्या निंबोळ्या जमा करून सुकवल्यानंतर त्यापासून निंबोळी अर्क तयार केला जातो. निंबोळी अर्काच्या उग्र वासामुळे किडी व अळीवर्गीय कीटक अंडी घालण्याचे टाळतात. त्यामुळे किडींच्या प्रादुर्भावावर प्रभावी नियंत्रण मिळते. तसेच दशपर्णी अर्काच्या वापरामुळे रसशोषक व अळीवर्गीय किडींवर नियंत्रण मिळवून उत्पादनात वाढ होते. या विषयावर तंत्रज्ञान समन्वयक सुरेश बेडवाल, मंडळ कृषी अधिकारी जे. एस. गायकवाड, उप कृषी अधिकारी डी. एस. पाटील, सहाय्यक कृषी अधिकारी दरबारसिंग गिरासे, समूह सहाय्यक महेंद्र राऊत, समूह सहाय्यक उमेश शिंदे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र गांधीली तुषार चव्हाण यांनी नैसर्गिक शेती व जैविक कीड नियंत्रण यावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना दरबारसिंग गिरासे यांनी केली तर आभार प्रदर्शन महेंद्र राऊत यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या मंजुषा मलदुडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस सुभाष काळे, सरपंच वाल्मीक वाघ, महेश मलदुडे, यांच्यासह उपसरपंच तसेच गावातील प्रगतशील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *