Headlines

उसाचे एकरी १०० टन उत्पादनासाठी अत्याधुनिक पद्धत वापरावी- थोरात




“ऊस हे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पादन देणारे पीक आहे. भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम तालुक्याचे हृदय म्हणून काम करताना सभासद व ऊस उत्पादकांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे. कारखान्याला जास्त इथेनॉल व वीज निर्मितीसाठी उसाची मोठी गरज असल्याने, कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड करावी,” असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२६ – २७ या गळीत हंगामाच्या मिल रोलर पूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, व्हा. चेअरमन पांडुरंग पा. घुले, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात, बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, हौशीराम सोनवणे, कारखान्याचे संचालक संपतराव गोडगे, सतीश वर्पे, विलास शिंदे, रामनाथ कुटे, विजय राहणे, गुलाबराव देशमुख, अरुण वाकचौरे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना थोरात म्हणाले की, एकरी शंभर टन ऊस उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी अत्याधुनिक पद्धतीचा वापर करावा. कारखान्याची वाटचाल आदर्श तत्त्वांवर सुरू असून आपण कायम चांगला भाव दिला आहे. चालू हंगामात कारखान्याने १ कोटी ४० लाख लिटर इथेनॉल निर्माण केले आहे. जागतिक युद्धांमुळे इंधनाचा तुटवडा भासत असताना इथेनॉल हा महत्त्वाचा पर्याय ठरत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले, तर आभार पांडुरंग पाटील घुले यांनी मानले. याप्रसंगी किरण कानवडे, कृष्णा दिघे, अशोक मुटकुळे, नवनाथ गडाख, संजय पाटील, भारत देशमुख, रामदास तांबडे व कर्मचारी उपस्थित होते. थोरात कारखान्यात दारूची निर्मिती नाही! आपल्या भाषणात बाळासाहेब थोरात यांनी कारखान्याच्या आदर्श शिस्तीचा आवर्जून उल्लेख केला. ते म्हणाले की, राज्यभरात अनेक सहकारी साखर कारखान्यांमध्ये अल्कोहोलपासून दारूची निर्मिती केली जाते. मात्र, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारांवर चालणाऱ्या या कारखान्यात दारू न बनवता, केवळ इंडस्ट्रियल अल्कोहोल निर्माण केले जाते, जो आपल्या कारखान्याचा एक आदर्श पॅटर्न आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *