![]()
अमरावती येथील सामरा नगरात सुरू असलेल्या एका कुंटनखान्यावर राजापेठ पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत देहव्यापारात गुंतलेल्या तीन महिला, एक पुरुष ग्राहक आणि देहव्यापाराचे संचालन करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेण्यात आले. सामरा नगरातील एका निवासी इमारतीमधील फ्लॅटमध्ये हा कुंटनखाना सुरू होता. अनेक दिवसांपासून या फ्लॅटमध्ये संशयास्पद लोकांची ये-जा सुरू असल्याची माहिती होती, मात्र निवासी भाग असल्याने कोणीही तक्रार करण्यास पुढे आले नव्हते. राजापेठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी धाड टाकताच परिसरात खळबळ उडाली. घटनास्थळावरून देहव्यापारात सहभागी असलेल्या महिलांसह ग्राहक म्हणून आलेल्या पुरुषालाही ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या महिला पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश राज्यातील आहेत. राजापेठ पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा (पीटा ॲक्ट) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Source link
सामरा नगरातील कुंटनखान्यावर पोलिसांची कारवाई:३ महिला, १ पुरुष आणि संचालिका ताब्यात