Headlines

विद्यार्थ्यांमध्ये केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर संस्कारांची शिदोरी असावी:कामती खुर्द येथे श्रीकृष्ण शैक्षणिक समूहाचा करिअर मेळावा; गुणवंतांचा सत्कार‎



ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हाती केवळ पुस्तकी ज्ञान नाही, तर शिस्त आणि संस्कारांची शिदोरी असावी, या जिद्दीतून कामती खुर्द येथील एम. बी. चव्हाण गुरुकुल येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आणि ‘१० वी नंतर पुढे काय?’ हा करिअर मार्गदर

.

या कार्यक्रमात लातूर पॅटर्नचे तज्ज्ञ ऋषिकेश जवळगे यांनी पालकांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आजच्या काळात शाळा-कॉलेजच्या जाहिरातींचा मोठा झगमगाट असतो. मात्र, पालकांनी पाल्याचा प्रवेश निश्चित करताना त्या संस्थेची खरी गुणवत्ता आणि निकालाची परंपरा तपासावी.” त्यांनी ११ वी-१२ वी विज्ञान शाखेचे महत्त्व सांगून भविष्यातील विविध करिअर वाटांचे सविस्तर दर्शन घडवले.

या मेळाव्यात दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रा. प्रमोद आवताडे यांच्या हस्ते ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. आपल्या यशाचे कौतुक होताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि भविष्यातील जिद्द स्पष्टपणे श्रीकृष्ण शैक्षणिक समूहाने यंदा मोहोळ तालुक्यात प्रथम क्रमांकाचा निकाल लावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. शहरात मिळणारे उच्च दर्जाचे शिक्षण आता कामतीसारख्या ग्रामीण भागात उपलब्ध करून देऊन, या संस्थेने स्थानिक विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे नवे दालन खुले केले आहे. केवळ गुण मिळवणे नव्हे, तर ‘संस्कारक्षम पिढी’ घडवणे हे या समूहाचे छुपे बलस्थान असल्याचे अधोरेखित झाले. ^ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या तोडीचे शिक्षण मिळावे, हाच आमचा ध्यास आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी केवळ गुण पुरेसे नाहीत, त्याला शिस्त आणि संस्कारांची जोड हवी. श्रीकृष्ण समूहाने ती गुणवत्ता सिद्ध केली असून पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी योग्य निवड करावी. — प्रा. प्रमोद आवताडे, संस्थापक अध्यक्ष स्पष्टपणे ओसंडून वाहत होती. व्यासपीठावर मार्गदर्शक निरंजन बनसुडे (केमिस्ट्री), अविनाश गायकवाड (बायोलॉजी), मोहम्मद आफताब अन्सारी (गणित), गौरी त्रिभुवन (इंग्रजी). पालक प्रतिनिधी रमेश आवताडे, गायकवाड, प्रा. सुनिल गरड, मुख्याध्यापक आप्पासाहेब कोळी मान्यवर उपस्थिती होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पाटील तर आभार आप्पासाहेब कोळी यांनी मानले.

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ‘मोहोळ पॅटर्न’

शिस्त, संस्कार हाच शिक्षणाचा पाया



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *