Headlines

कामाला यश:डिकसळ- कोंढार चिंचोली पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त, 55 कोटींच्या पुलासाठी नेत्यांचा पाठपुरावा फळाला




करमाळा करमाळा तालुक्यातून पुणे-मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि पश्चिम भागातील जनतेसाठी जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या डिकसळ-कोंढार चिंचोली नवीन पुलाच्या कामाला अखेर गती मिळाली आहे. राजकीय अडथळे आणि संथ गतीमुळे रखडलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ब्रिटिशकालीन पुलाला जड वाहनांची बंदी सध्या वाहतुकीसाठी वापरला जाणारा जुना पूल ब्रिटिशकालीन असून तो अत्यंत जीर्ण झाला आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव या पुलावरून जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन पुलाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. अजितदादांचा निधी अन् संजयमामांचा शब्द माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी जनतेला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी या पुलाचा सातत्याने पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी ५५ कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला होता. मात्र, मध्यंतरीच्या काळात राजकीय घडामोडी आणि प्रशासकीय पेचामुळे पटेल इंजिनियर्स कंपनीकडून सुरू असलेल्या कामाची गती मंदावली होती. नेत्यांची ‘वज्रमूठ’ कामाला आली हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यासह माजी उपाध्यक्ष, जि.प. सुभाष गुळवे, माजी जि.प. सदस्या सवितादेवी राजेभोसले, नागेशकाका लकडे, देवीदास साळुंखे, डॉ. गोरख गुळवे, मंत्री दत्तामामा भरणे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केले आहे. ^कोंढार चिंचोली ते डिकसळ या पुलासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांनी ५० कोटी निधी उपलब्ध करून दिला. या डिक्सळ पुलामुळे सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर या तिन्ही जिल्ह्यांना पुण्याकडे जाण्यास मार्ग सुकर झाला आहे. अॅड. अजित विघ्ने, उपसभापती ^कोंढार चिंचोली ते डिकसळ या पुण्याकडे जाणाऱ्या पुलाला डिसेंबर २०२१ रोजी मंजुरी मिळाली. ऑगस्ट २०२३ ला वर्कऑर्डर तयार झाली, एकूण ५० कोटी या कामासाठी शासनाकडून निधी मंजूर झाला. आज रोजी या पुलाचे काम पाण्यामध्ये पाईल फाउंडेशन आणि पियरचे काम सुरू झाले आहे. २ वर्षांमध्ये पूल तयार होईल. ऐ. डी. पवार, उपकार्यकारी अभियंता बांधकाम विभाग



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *