Headlines

Sanjay Raut Attacks Amit Shah Over Mumbai Security Controversy


“शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) आज होणाऱ्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, महाराष्ट्रातील आणि देशातील जुलमी राजवटीचा ‘रेझिम चेंज’ (सत्तापालट) करण्याचा अंतिम एल्गार आज शिवतीर्थावरून पुकारला जाईल. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस स

.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत यांनी अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबार, बिश्नोई टोळीचे नेटवर्क, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यातील घडामोडी, कोल्हापुरातील ‘गोकुळ’ दूध संघाचा निकाल आणि महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर रोखठोक भाष्य केले.

टायगर श्रॉफकडे धाव घेणारे पुर्णेकरांच्या घरी का गेले नाहीत?

कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरताना संजय राऊत म्हणाले, “टायगर श्रॉफवरील हल्ल्यातील आरोपींना 12 तासांच्या आत अटक केल्याचा दावा केला जात आहे आणि मुख्यमंत्री सांगत आहेत की बॉलिवूडने घाबरू नये, त्यांना सुरक्षा दिली जाईल. पण मुळात देशाच्या आर्थिक राजधानीत बॉलिवूड कलाकारांना सुरक्षा देण्याची वेळ का येते, याचे आत्मचिंतन मुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे. सामान्य जनतेवर गोळ्या झाडल्या तरी चालतील, पण सिनेकलाकार तुमचे प्रचारक असल्याने त्यांनाच पायघड्या घातल्या जात आहेत.”

जॅकी श्रॉफच्या जुन्या विधानाची आठवण

“टायगर श्रॉफचे वडील जॅकी श्रॉफ एकेकाळी म्हणत होते की ‘देश सुरक्षित हातांत आहे’; आता त्यांना कळाले असेल की देश नक्की कोणाच्या हातात सुरक्षित आहे! अभिनेत्यावर हल्ला झाल्यावर उपमुख्यमंत्री आणि मंत्री तातडीने त्याच्या घरी पोहोचतात, पण ठाण्यात भरचौकात हत्या झालेल्या राजकीय कार्यकर्ते प्रदीप पुर्णेकर यांच्या घरी जायला सत्ताधाऱ्यांना लाज वाटते.”

बदलापूर एन्काउंटरवरून संशय

“सत्ताधारी म्हणतात गोळीला गोळीने उत्तर देऊ. मग बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील संस्थाचालक उघडे पडू नयेत म्हणून जसे आरोपीचे एन्काउंटर केले, तसेच उत्तर पुर्णेकरांच्या मारेकऱ्यांना का दिले नाही? पुर्णेकर यांचे कुटुंबीय उघडपणे स्थानिक सत्ताधारी पदाधिकाऱ्यांची नावे घेत आहेत, मग त्यांच्यावर कारवाई का होत नाही?”

70,000 शूटर्स तयार असल्याच्या दाव्यावर देशाचे गृहमंत्री गप्प का लपून बसलेत?

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या वाढत्या दहशतीवर बोलताना राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. “सलमान खान, बाबा सिद्दिकी, टायगर श्रॉफ अशा एकामागोमाग एक घटना घडवून टोळ्यांचे हँडलर्स धमक्या देत आहेत की आमच्याकडे तब्बल 70,000 शूटर्स तयार आहेत. जम्मू-काश्मीर आणि ईशान्येकडील स्लिपर सेल उद्ध्वस्त केल्याच्या वल्गना करणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या 70,000 शूटर्सच्या दाव्यावर तोंड उघडायला का तयार नाहीत? ते कुठे लपून बसले आहेत की ते स्वतःच यांचे हँडलर आहेत?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

संघाने जगदीप धनखड यांना बोलावून दाखवून दिले

नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, “सरसंघचालक मोहन भागवत अलीकडे परखड सत्य बोलू लागले आहेत. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी स्वाभिमानी भूमिका घेतल्याने मोदी-शहांनी त्यांना पदावरून हटवले होते. त्याच धनकड यांना नागपूरच्या मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करून संघाने स्पष्ट संदेश दिला आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोदी-शहांचा गुलाम नाही. मनमोहन सिंग यांच्या जागी मोदींना आणूनही देशाची परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिघडली आहे, हे वास्तव आता समोर येत आहे.”

‘गोकुळ’ दूध संघाचा निकाल म्हणजे ‘रेझिम चेंज’ची नांदी

पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या विजयाचे त्यांनी स्वागत केले. “गोकुळ दूध संघाची निवडणूक ही पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची लिटमस टेस्ट होती. सतेज पाटील यांच्या पॅनलने जिंकलेल्या 3 जागांवर फेरमतमोजणी लावून भाजपच्या बाजूने निकाल लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट दबाव आणला. तरीही सतेज पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पॅनलला धूळ चारत झेंडा फडकवला. ही निवडणूक ईव्हीएमवर नव्हे तर बॅलेट पेपरवर झाली होती, त्यामुळेच शेतकऱ्यांचा खरा कौल समोर आला.”

शिंदे-पवार यांचे पक्ष नव्हेत, अमित शहांचे गट

सुनेत्र पवार आणि पार्थ पवार यांनी दिल्लीत घेतलेल्या अमित शहा यांच्या भेटीवर भाष्य करताना त्यांनी उपरोधिक टोला लगावला. “एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गट हे स्वाभिमानी राजकीय पक्ष नाहीत, तर ते अमित शहा यांनी निर्माण केलेले दोन तात्पुरते गट आहेत. जोपर्यंत अमित शहा सत्तेत आहेत, तोपर्यंतच या गटांना अस्तित्व आहे. केंद्रातून सत्ता जाताच हे दोन्ही गट पूर्णपणे अनाथ होतील आणि त्यांना कुठल्यातरी अनाथ आश्रमाचा मार्ग शोधावा लागेल,” असे भाकीत संजय राऊत यांनी शेवटी वर्तवले.

———————————————————

हेही वाचा…

नरेंद्र मेहतांची आमदारकी रद्द करा, प्रताप सरनाईकांची राज्यपालांकडे मागणी: म्हणाले- पत्रकारांवर हल्ला, मध्यरात्री महापालिका आयुक्तांच्या घरात घुसून ओलीस ठेवले!

“मीरा-भाईंदर शहरात लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकारांवर आणि सामान्य नागरिकांवर महापालिकेच्या सभागृहात नगरसेवकांकडून भरदिवसा जीवघेणे हल्ले केले जातात. एवढ्यावरच न थांबता, भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 250 ते 300 जणांचा जमाव मध्यरात्री एका तरुण आयएएस (IAS) महापालिका आयुक्तांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसतो, त्यांच्या पत्नी व लहान मुलांसमोर त्यांना तब्बल 3 ते 4 तास ओलीस (बंधक) ठेवतो आणि पोलिसांवर खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी दबाव आणतो. हा संपूर्ण प्रकार म्हणजे लोकशाहीची उघड हत्या आणि सत्तेचा नंगानाच आहे. अशा गुंड प्रवृत्तीच्या आमदार नरेंद्र मेहता यांची आमदारकी तत्काळ रद्द करण्यात यावी आणि घुसखोरी करणाऱ्या नगरसेवकांचे पद बरखास्त करावे,” अशी आक्रमक आणि खळबळजनक मागणी शिवसेना नेते तथा आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.