Headlines

एकतर्फी प्रेमातून हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थिनीची निघृण हत्या:आरोपीला 24 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी, रक्ताने माखलेलं कपडे, धारदार चाकू जप्त




सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वर्दे येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणाऱ्या 23 वर्षीय दामिनी पालव हिची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी साहिल धुरी याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आज त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 24 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील वर्दे-पालववाडी येथील महाविद्यालयीन युवती दामिनी पालव हिच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुरावे हस्तगत केले आहेत. खून करण्यासाठी संशयित आरोपी साहिल धुरी याने वापरलेला धारदार चाकू, त्याची दुचाकी तसेच दामिनी आणि साहिल यांचे मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वर्दे गावातील कुंभारवाडी येथील ओहळानजीक ही भयानक घटना घडली होती. आरोपीने दामिनीवर धारदार शस्त्राने तब्बल 17 ते 18 वार करून तिचा जीव घेतला. या घटनेनंतर पोलिसांनी संशयिताला घटनास्थळी नेऊन सखोल चौकशी केली आहे. एकतर्फी प्रेमातून घडला प्रकार सिंधुदुर्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तातडीने कारवाई करत पसार झालेल्या आरोपी साहिल धुरी याला त्याच्या राहत्या घरातून रात्रीच ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी त्याचे रक्ताने माखलेले कपडेही जप्त केले आहेत. या महाविद्यालयीन तरुणीच्या हत्येमुळे संपूर्ण जिल्ह्यात संताप व्यक्त होत असून महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील ओळखीतून आरोपी साहिल धुरी याचे दामिनी पालव हिच्यावर एकतर्फी प्रेम जडले होते. मात्र, दामिनीने त्याच्या प्रेमाला स्पष्ट नकार दिला होता आणि नुकताच तिचा विवाह ठरला होता. याच रागातून आरोपीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. कशी घडली घटना? घटनेच्या दिवशी आरोपी दामिनीची वाट पाहत घटनास्थळी थांबला होता. महाविद्यालयातून एसटी बसने प्रवास करून दामिनी आपल्या गावात उतरली आणि घरी जात असताना आरोपीने तिची वाट अडवली. त्याने तिच्याकडे पुन्हा एकदा प्रेम स्वीकारण्याचा आग्रह धरला. मात्र, दामिनीने पुन्हा नकार देताच संतापलेल्या आरोपीने तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे दामिनीचा जागीच मृत्यू झाला. हे ही वृत्त वाचा मी पक्ष बदलणार नाही, कायम राष्ट्रवादीसोबतच:भाजप प्रवेशाच्या केवळ अफवा, महायुतीत अर्थखाते राष्ट्रवादीकडेच राहिले पाहिजे- प्रताप पाटील चिखलीकर
मी भाजपमध्ये यावे, असे अनेक जणांना वाटत असेल; त्यातूनच माझ्या भाजप प्रवेशाची चर्चा झाली असावी. पण, अनेक नेत्यांना असेही वाटते की मी भाजपमध्ये येऊ नये. पण भाजप प्रवेशासारखे काहीच नाही, मी पक्ष बदलणार नाही. ही माहिती ज्यांनी दिली, त्याची शहानिशा माध्यमांनी करायला हवी होती, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी म्हटले आहे. मी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अजित पवारांनी माझ्यावर सख्या भावाप्रमाणे प्रेम केले. त्यांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवारांनी नेतृत्व स्वीकारले आणि त्यांनी सुद्धा माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आहे. त्यामुळे मी कायम त्यांच्यासोबतच राहणार असे चिखलीकर म्हणाले. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *