युरोपातील अल्बानिया देशामध्ये आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाची इमारत पेटवून दिल्याचा व्हिडिओ शेअर करत ‘भारतानेही यातून धडा घ्यावा’, असा सल्ला देणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपने अत्यंत आक्रमक शब्दा
.
संजय राऊतांची पोस्ट- अल्बानियातून भारताने धडा घ्यावा!
संजय राऊत यांनी अल्बानियातील सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीला लागलेल्या आगीचा व्हिडिओ शेअर करत एक खळबळजनक पोस्ट केली होती. “अल्बानियात लोकांनी सर्वोच्च न्यायालय जाळून टाकले. तेथील सर्वोच्च न्यायालय भ्रष्ट पंतप्रधानांना उघड मदत करत असल्याने जनता संतप्त झाली होती. आंदोलक जनतेने संसद, सरकारी कार्यालये आणि मंत्र्यांच्या घरांवरही हल्ले चढवले आहेत. सर्वच देशांनी या घटनांपासून वेळीच धडा घेतला पाहिजे; विशेषतः भारताने,” असे राऊत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते. एका परकीय देशातील अराजकतेचे आणि न्यायालयीन इमारतीच्या जाळपोळीचे उदाहरण देऊन भारताला अप्रत्यक्ष इशारा देण्याच्या राऊतांच्या भूमिकेवर सत्ताधाऱ्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.
देशातील संविधानिक संस्थांचा अवमान थांबवा! -किरीट सोमय्या
संजय राऊत यांच्या या विधानावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्हिडिओ संदेश जारी करत अत्यंत कडक शब्दांत समाचार घेतला. “संजय राऊत हे पद्धतशीरपणे देशातील लोकशाही यंत्रणांवर हल्ला करत आहेत. देशाच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर बसलेल्या महामहिम राष्ट्रपतींचा त्यांनी वारंवार अनादर केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाला शिवीगाळ केली आणि आता ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांचा अपमान करत आहेत.”
अल्बानियातील हिंसाचाराचे समर्थन का?
“अल्बानियात आंदोलकांनी सुप्रीम कोर्ट जाळले, त्याचे राऊत स्वागत करत आहेत. त्यांना देशात अशांतता, हिंसाचार आणि दंगली घडवायच्या आहेत का? देशातील 140 कोटी जनता अशा प्रवृत्तींना कधीही यशस्वी होऊ देणार नाही. न्यायालयाचा अवमान करणाऱ्या राऊतांना न्यायव्यवस्थेसमोर हिशेब द्यावाच लागेल,” असे सोमय्या म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयात राऊतांविरुद्ध अवमान याचिका; कारणे दाखवा नोटीस जारी
यापूर्वीही न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती यांच्या खंडपीठाने न्यायव्यवस्थेबाबत केलेल्या सार्वजनिक विधानांची गंभीर दखल घेत संजय राऊत यांना अवमाननेची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
वादाची मूळ पार्श्वभूमी
विरोधी पक्षांच्या एका शिष्टमंडळाने वैयक्तिक भेटीची वेळ मागितली असता सरन्यायाधीशांनी, ‘न्यायालयाशी संबंधित विषय केवळ याचिकेद्वारेच मांडले जावेत’, असे सांगत प्रत्यक्ष भेट नाकारली होती. या निर्णयानंतर राऊत यांनी न्यायालयावर जाहीर टीका केली होती.
बार असोसिएशनचा आक्षेप
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशननेही (SCBA) राऊत यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप घेत, त्यांचे आरोप अधिकृत नोंदींच्या पूर्णपणे विपरीत असल्याचे म्हटले होते. न्यायालयाच्या खंडपीठाने राऊतांना पुढील सुनावणीत हजेरीपासून तात्पुरती सूट देत आधी त्यांच्या लेखी उत्तराची तपासणी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अल्बानियातील जाळपोळीच्या घटनेवरून संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे न्यायव्यवस्था आणि विरोधकांमधील संघर्ष आता अधिक तीव्र व टोकदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.
—————————————————
हेही वाचा…
70,000 शूटर्सच्या दाव्यावर अमित शहा गप्प का, संजय राऊतांचा सवाल:म्हणाले- बॉलिवूड तुमचे प्रचारक म्हणून त्यांना सुरक्षा, अन् सामान्य कार्यकर्त्यांवर गोळ्या झाडल्या तरी चालतील?

“शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) आज होणाऱ्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याची संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून, महाराष्ट्रातील आणि देशातील जुलमी राजवटीचा ‘रेझिम चेंज’ (सत्तापालट) करण्याचा अंतिम एल्गार आज शिवतीर्थावरून पुकारला जाईल. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेले नाहीत, जनतेच्या रोषापुढे त्यांना पायउतार व्हावेच लागेल. मुंबई आज गुंड आणि भाजपशी संबंधित बिल्डरांच्या दावणीला बांधली गेली आहे. अभिनेत्यांच्या गाड्यांवर गोळ्या चालल्या की सत्ताधारी तातडीने त्यांच्या घरी धाव घेतात, मात्र ठाण्यात घरासमोर मारल्या गेलेल्या प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करायला कोणालाही वेळ नाही. हा दुटप्पी कारभार महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी पाहत आहे,” असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी