![]()
ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकऱ्यांची सोय याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि दिलेल्या वेळेतच पूर्ण करा, अशा कडक सूचना आमदार राजू खरे यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. मोहोळ तहसील कार्यालय येथे आयोजित विशेष बैठकीत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना’ अंतर्गत मतदारसंघातील विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची कामे सध्या कोणत्या टप्प्यावर आहेत आणि अंमलबजावणीमध्ये कोणत्या तांत्रिक किंवा प्रशासकीय अडचणी येत आहेत, याची सविस्तर माहिती आ. खरे यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. शेतकऱ्यांच्या दृष्टीने शेतीमालाची वाहतूक आणि शेतात ये-जा करण्यासाठी हे रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरील अडथळे त्वरित दूर करून कामांचा वेग वाढवण्याचे आदेश त्यांनी दिले. या आढावा बैठकीस उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन मुळीक, गटविकास अधिकारी जाधव, गटविकास अधिकारी अविचल महाडिक उपस्थित होते. बैठकीला बाबासाहेब पाटील, प्रकाश कांबळे, सूर्यकांत मोरे, हर्षद बिगडे, रामचंद्र माळी यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकरी हितासाठी कटिबद्ध शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असा विश्वासही आमदार राजू खरे यांनी यावेळी व्यक्त केला.
Source link
मोहोळ तालुक्यात पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा