![]()
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात यंदा मान्सूनचे आगमन उशिराने झाल्याने धरणातील जलसाठा मागील वर्षाच्या तुलनेत घटला आहे. ७ जुलैअखेर धरणात केवळ २९ टक्के जलसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी तो ६३ टक्के होता. त्यामुळे जलसाठ्यात तब्बल ३४ टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. मात्र, पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर नवीन पाण्याची आवक सुरू झाली असून, आगामी महिनाभरात पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण भरू शकते, अशी शक्यता व्यक्त होत आहे. मागील वर्षी ७ जुलै २०२५ रोजी मुळा धरणात १६ हजार ४७८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होता. यंदा तो केवळ ७ हजार ६९३ दशलक्ष घनफुटांवर आहे. त्यामुळे पाणी उपलब्धतेबाबत चिंता कायम असली तरी सध्याच्या पावसामुळे दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. सोमवारपासून धरणात सुमारे १८ हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू झाली होती. मंगळवारी दुपारनंतर आवक वाढून ३२ हजार २२० क्युसेक इतकी झाली. प्रतिनिधी | अहिल्यानगर जूनमध्ये मोठा खंड दिलेला पाऊस जुलैच्या पहिल्या आठवड्यात चांगलाच बरसत आहे. गत २४ तासांत जिल्ह्यात २८.१ मिमी पावसाची नोंद झाली. सरासरी गाठण्याच्या दिशेने पावसाने आगेकुच केली आहे. परंतु जिल्ह्यात पडणाऱ्या पावसात विषमता दिसून येत आहे. पाच तालुक्यांनी सरासरी ओलांडली असून ९ तालुके अद्याप सरासरीच्या खालीच आहेत. ७ जुलैअखेर जिल्ह्यात सरासरी १३०.२ मिमी पावसाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात ११८.९ मिमी पाऊस झाला असून जिल्ह्याने सरासरीच्या ९१.३ टक्के पल्ला गाठला आहे. मात्र या सरासरीमागे मोठी तालुकानिहाय विषमता दडलेली आहे. कर्जत (१७२.९%), श्रीगोंदे (१४४.८%), पारनेर (१२२.३%), जामखेड (१०९.४%) आणि अकोले (१०२.७%) या पाच तालुक्यांनी जिल्ह्याची सरासरी गाठण्याच्या दिशेने मोठी मदत केली आहे. दुसरीकडे, राहुरीत केवळ २३ टक्के पाऊस झाल्याने खरीप हंगामाबाबतची चिंता कायम आहे. तर राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव, संगमनेर, राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव, नगर तालुका सरासरीच्या मागे आहेत. विशेष म्हणजे जुलैच्या पहिल्याच आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्याची एकूण टक्केवारी झपाट्याने वाढली. जूनमध्ये जिल्ह्यात केवळ ६२.७ टक्के पाऊस झाला होता; तर १ ते ७ जुलैपर्यंत २२ मिमी पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात ५१.१ मिमी पाऊस झाला आहे. जूनची तूट जुलैमध्ये भरून निघाली. { अकोले ६७.७ { राहाता ४२.२ { पारनेर ३७.४ { कर्जत ३७.८ जोरदार पावसामुळे कोल्हार घोटी रोडवरील माळेगाव येथील भातशेत असे तुडुंब भरले आहे. छाया : विलास तुपे. { श्रीगोंदे ४२.३ हरिश्चंद्रगड परिसरातून मुसळधार पाऊस हो त असल्याने मुळा नदीला पूर आला आहे. नदीची पातळी वाढल्याने अकोले तालुक्यातील लहीत खुर्द व लहीत बु. गावांना जोडणारा मुळा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे अकोले ते ब्राह्मणवाडाकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. नागरिकांची दैनंदिन दळणवळणाची गैरसोय होत आहे. Q: कुठे जास्त, तर कुठे कमी पाऊस का? A : यंदा “पॉकेट रेन’ स्वरूपात झाला. म्हणजे काही भागांवर ढग स्थिरावल्याने तेथे मुसळधार पाऊस झाला; तर काही किलोमीटर अंतरावरील तालुक्यांत ढग सरकून गेल्याने पाऊसच झाला नाही. त्यामुळे तालुकानिहाय मोठी तफावत निर्माण झाली. Q : तफावतीचा खरीपावर सर्वाधिक परिणाम कुठे? A: सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेल्या कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, जामखेड आणि अकोलेमध्ये पेरण्या व पिकांची वाढ वेगाने होऊ शकते. मात्र राहुरी, राहाता, संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव आणि शेवगावमध्ये जमिनीत पुरेशी ओल नसल्याने उशिरा पेरणी, दुबार पेरणी किंवा पिकांची वाढ खुंटण्याचा धोका कायम आहे. Q : पुढील आठवडाभर काय स्थिती राहिल? A : सरासरी ओलांडलेल्या तालुक्यांपेक्षा तुटीतील तालुक्यांना ओल भरून काढणे आणि खरीप पिकांना आधार देणे हे सध्या अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत पावसाचे “वितरण’ हे एकूण पावसाच्या प्रमाणापेक्षा अधिक निर्णायक ठरणार आहे. ^जुलैच्या पहिल्या ७ दिवसांत पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. जून महिन्यात कमी पावसामुळे रखडलेल्या पेरण्या आता चांगल्या पावसामुळे शेतकरी वर्गाला करता येणार आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उशिरा सक्रीय झाला आहे. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे जमिनीत ओल निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाने खरीपाच्या पेरण्यांना सुरुवात करण्यास हरकत नाही. – रवी आंधळे, शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
Source link
तिकडे तूट:जिल्हा एक…मान्सूनचे रंग दोन, गत 24 तासांत 28 मिमी पावसासह सरासरीच्या 91% पल्ल्यापर्यंत जिल्ह्याची मजल