![]()
मोहोळ पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार हे सेवानिवृत्त झाल्याने सदर ठिकाणी पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांची नियुक्ती झाली आहे. मोहोळ पोलिस स्टेशनचा पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मोहोळ शहरातील वाहतुकीसह रस्त्यावर होणारा अतिक्रमणाचा अडथळा दूर करण्यास सुरुवात केली आहे. सोमवार, दि. ६ जुलै रोजी केलेल्या कारवाईमध्ये ५० वाहनांवर दंडात्मक कारवाई करून ३९,५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर पोलीस निरीक्षकांनी सुरू केलेल्या कारवाईमध्ये सातत्य ठेवल्यास मोहोळ शहरासह तालुक्यातील वाहनचालकांसह सर्वच व्यवसाय चालकांना शिस्त लागण्यास मदत होईल. मात्र तालुक्यातील अवैध धंद्यांसह वाहनचालकांना पोलिस निरीक्षक दीपक पाटील शिस्त लावतील काय, याकडे शहरासह तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. मोहोळ पोलिस स्टेशनच्या वतीने वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे, नो पार्किंग, विना कागदपत्र वाहन चालवणे, फॅन्सी नंबर प्लेट, गॉगल काच इत्यादी वाहतूक नियमांचे भंग केल्यामुळे ५० वाहनचालकांवर वाहतूक नियमाप्रमाणे कारवाई करण्यात आली. सूचनेनंतर फलक लावल्यास दंडात्मक कारवाई करण्यात यावी नियमांचे पालन करावे ^हेल्मेट वापरा, सीट बेल्ट बांधा, वेग मर्यादेत राहा, वाहन चालवताना मोबाईल संभाषण टाळावे. वाहतूक नियमांचे पालन करावे. दीपक पाटील, पोलिस निरीक्षक, मोहोळ
Source link
मोहोळमध्ये 50 वाहन चालकांवर कारवाई:वाहतूक नियमभंग करणाऱ्यांकडून 39,500 रुपयांचा दंड वसूल, पार्किंगबाबत सूचना