Headlines

ग्रामपंचायतींनी पालखी मार्गावरील बॅनर्ससह होर्डिंग्ज तत्काळ हटवावेत:गटविकास अधिकारी जाधव यांचे भंडीशेगाव व वाखरी ग्रामपंचायतींना पत्र‎



आषाढी एकादशी वारीच्या अनुषंगाने पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत पालखी सोहळ्यांचे आगमन होत आहे. या काळात कायदा, सुव्यवस्था आणि भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पालखी मार्ग आणि मुक्कामाच्या ठिकाणचे बॅनर्स, फ्लेक्स व होर्डिंग

.

पंढरपूर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या पोलिस निरीक्षकांनी १ जुलै रोजी दिलेल्या पत्रान्वये पंचायत समितीने ही कडक पावले उचलली आहेत. या संदर्भात पिराची कुरोली, भंडीशेगाव आणि वाखरी या तीन ग्रामपंचायतींच्या सरपंच, प्रशासक आणि ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत.

यंदाच्या आषाढी वारी सोहळ्यादरम्यान पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत साधारण ७ ते ८ लाख भाविक आणि वारकरी येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २२ जुलै रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम पिराची कुरोली येथील पालखी तळावर होईल. याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भंडीशेगाव येथे मुक्कामासाठी विसावेल. २३ जुलै रोजी दोन्ही पालखी सोहळे वाखरी येथे मुक्कामासाठी एकत्र येतील. याच दिवशी वाखरी येथील बाजीराव विहीर येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अत्यंत प्रेक्षणीय असे उभे आणि गोल रिंगण पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील लाखो भाविकांची गर्दी आणि पालखी सोहळ्याचा मार्ग लक्षात घेता, रस्त्यावरील किंवा पालखी तळाच्या परिसरातील अनधिकृत बॅनर्स, फ्लेक्स आणि होर्डिंग्जमुळे अडथळा निर्माण होऊ शकतो. तसेच सुरक्षेचा धोका निर्माण होऊ नये म्हणून हे सर्व साहित्य तात्काळ हटवण्याच्या सूचना गटविकास अधिकारी अमोल जाधव यांनी दिल्या आहेत. वारकऱ्यांच्या सुविधेसोबतच पालखी सोहळ्यातील आणि रिंगणातील अश्वांच्या (घोड्यांच्या) आरोग्याची व इतर व्यवस्था पाहण्याच्या दृष्टीने, तालुका पशुधन विकास अधिकारी (विस्तार) व दुग्धव्यवसाय अधिकारी यांनाही योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. तसेच पालखी मार्ग व मुक्कामाच्या ठिकाणी ग्रामपंचायतींमार्फत फिरती शौचालये (मोबाईल टॉयलेट्स) आणि पिण्याच्या पाण्याचे टँकर तैनात करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. वारीच्या काळात उद्भवणाऱ्या तात्कालिक आजारांवर उपचारासाठी पालखी तळांवर २४ तास वैद्यकीय पथके, रुग्णवाहिका आणि औषध साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. २२ जुलै : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम पिराची कुरोली येथील पालखी तळावर होईल. याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा भंडीशेगाव येथे मुक्कामासाठी विसावेल. २३ जुलै : दोन्ही पालखी सोहळे वाखरी येथे मुक्कामासाठी एकत्र येतील. याच दिवशी वाखरी येथील बाजीराव विहीर येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अत्यंत प्रेक्षणीय असे ‘उभे आणि गोल रिंगण’ पार पडणार आहे.

पालखीच्या अश्वांच्या आरोग्याची जबाबदारी पशुधन विभागाकडे



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *