Headlines

अमरावती विद्यापीठात परीक्षा शुल्क माफीचा पेच:शासनाच्या निर्देशानंतर समिती गठीत; दर 15 दिवसांनी अहवाल देणार




अमरावती विभागात दुष्काळ जाहीर झाल्याने राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे अमरावती विद्यापीठासमोर शुल्कमाफीचा पेच निर्माण झाला आहे. शुल्कमाफीची संहिता निश्चित करण्यासाठी एका विशेष कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. विद्यापीठाचे सर्व परीक्षा अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातात. सध्या ऑनलाईन सिस्टीममध्ये विनाशुल्क अर्ज स्वीकारण्याचा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी सशुल्क अर्ज भरले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे, त्यांना ती रक्कम थेट बँक खात्यात परत मिळेल. यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमार्फत अर्ज सादर करावा लागेल. महाविद्यालय ही यादी विद्यापीठाकडे पाठवतील. उच्च शिक्षण मंत्र्यांच्या निर्देशानुसार कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली समिती काम करेल. शुल्कमाफीचा लाभ फक्त यावर्षीच्या नियमित परीक्षांसाठी असून, पालकांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी असलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळेल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी शुल्कमाफ नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *