![]()
अंथरलेल्या ताडपत्रीवर पाय घसरल्यामुळे दोघे खड्ड्यात पडल्याचा अंदाज खेळताना पाणी साठवण्याच्या खड्ड्यातपडून दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.लातूर शहरातील बोधेनगर परिसरात रविवारी दुपारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बोधे नगरयेथील रामला इंडस्ट्रीजच्या पाठीमागीलभागात ही घटना घडली. दिव्या नवनाथउबाळे (६) व कार्तिक भरत कांबळे(७) अशी दोघा मृतांची नावे अाहेत.दुपारी ते दोघे घराशेजारी खेळत होते. अशी उघड झाली घटना रविवार सुटीचा दिवस असल्याने परिसरात दुपारी शुकशुकाट होता.दिव्या आणि कार्तिक दोघेघराबाहेर खेळत होते. खेळतानादोघे खड्ड्यात पडले. त्यामुळेलागलीच ही घटना कुणालासमजली नाही. बराचवेळहोऊनही दोघे घराजवळ दिसतनसल्याने कुटुंबियांनी त्यांचा शोधघेतला. त्यावेळी ते खड्ड्यातपडल्याचे आढळले. घटनेचीमाहिती मिळताच परिसरातीलनागरिकांनी तातडीने दोघांना बाहेरकाढून शासकीय रुग्णालयातदाखल केले. मात्र वैद्यकीयअधिकाऱ्यांनी तपासणीअंतीदोघांनाही मृत घोषित केले.कुटुंबियांनी आक्रोष केला. इनसाइड स्टोरी- टँकर व्यावसायिकास जागा भाडेतत्त्वावर दिली ज्या खड्ड्याने दोन मुलांचा बळीघेतला त्या जागेच्या मालकानेआपला प्लॉट टँकर व्यावसायिकालाभाडेतत्त्वावर दिला आहे. संबंधितव्यावसायिकाने प्लॉटमध्ये खड्डाखोदून त्यात ताडपत्री अंथरली आहे.२० फूट रुंद, २० फूट लांब आणि १५फूट खोलीचा खड्डा खोदला आहे. याखड्ड्यात बोअरवेलचे पाणी साठवलेजात होते. खड्ड्यात ७ फूट पाणीहोते. या पाण्याचा पुरवठावसतिगृहांसह इतर भागात केला जातहोता. या खड्ड्याला संरक्षक कुंपणनाही. तसेच रस्त्यालगत असलेला हाखड्डा वाहनांसाठी धोक्याचा आहे. फर्स्ट पर्सन – साखळी करून मुलांना काढले बुडालेल्या मुलाचे वडील खड्ड्याजवळ आरडाओरडा करताना दिसल्याने मदतीसाठी धावलो. मुलांना खड्ड्याबाहेर काढणे एकट्याला शक्य नव्हते. त्यामुळे मी पाच ते सहा जणांना बोलावून घेतले. सर्वांनी एकमेकांच्या हातात हात घेऊन साखळी करून मुलांना बाहेर काढले. दोघांना तातडीने शासकीय रुग्णालयात नेले. – धीरेंद्र जवळगेकर, परिसरातील रहिवासी
Source link
पाणी साठवण्याच्या खड्ड्यात दोघे बुडाले:शेवाळामुळे लक्षात आला नाही प्रकार, खेळताना दोघे घराजवळील खड्ड्यात पडले