![]()
राज्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. संपूर्ण जून महिन्याची पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यातच भरून निघाली आहे. एकीकडे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळून मुंबईला पावसापासून थोडा दिलासा मिळाला असला, तरी पुण्यात मात्र परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरले आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावर आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पुण्याची धाकधूक वाढली, नाशिककरांना दिलासा गेल्या आठवडाभरापासून सातत्याने सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील खडकवासला धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून धरणातून २७,००० क्युसेक वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. या विसर्गामुळे डेक्कन परिसरातील भिडे पूल पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, सिंहगड रोडवरील एकता नगर सोसायटीत पाणी शिरल्याने प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना राबवल्या जात आहेत. दुसरीकडे, हवामान विभागाने नाशिकमध्ये दिलेला ढगफुटीचा इशारा टळला असून, हे ढग पालघर आणि गुजरातच्या दिशेने सरकल्याने नाशिककरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. तरीही पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा धोका कायम आहे. मुंबईत ‘यलो अलर्ट’, संपूर्ण देश व्यापण्यास मान्सून सज्ज मुंबईकरांना आज पावसापासून थोडी विश्रांती मिळाली असली तरी, शहरात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे वरळीसह काही सखल भागात पाणी साचले होते, मात्र आज रस्ते वाहतूक सुरळीत सुरू आहे. रेल्वे वाहतुकीवर थोडा परिणाम झाला असून मध्य रेल्वे ५ मिनिटे, तर हार्बर लाईन १० मिनिटे उशिराने धावत आहे. दरम्यान, रायगड, पालघर, कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या घाटमाथ्यांसह विदर्भातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून अरबी समुद्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमार्गे पुढे सरकत संपूर्ण देशाला व्यापून टाकेल, असा मोठा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. मुंबईत हलक्या सरींमध्येही वाहतूक सुरळीत
मुंबईत आज सकाळी शहरातील विविध भागांत हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला तरी शहरातील रस्ते वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रशासनाकडून नागरिकांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नालासोपारा रेल्वे स्थानक जलमय
पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नालासोपारा रेल्वे स्थानक आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या जिल्ह्यांनाही मुसळधार पावसाचा अलर्ट अहिल्यानगर, धुळे, मुंबई, उपनगरे, नंदुरबार, नाशिक, पालघर, पुणे, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा.. 36 तासांत 18 इंच पाऊस, अर्धे सुरत बुडाले:गुरुग्राममध्ये 10km वाहतूक कोंडी, राजस्थानमध्ये 3 लोकांवर वीज कोसळली; जबलपूरमध्ये 5 मजली इमारत कोसळली
मंगळवारी गुजरातच्या कामरेजमध्ये 10 तासांत 305 मिमी आणि सुरतमध्ये 260 मिमी पाऊस झाला. सुरतमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. रस्त्यांवरून गाड्या वाहून गेल्या. पूरग्रस्त भागातून सुमारे 2100 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. सुरत आणि नवसारीमध्ये शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. लोकांना अत्यंत आवश्यक असल्यासच घराबाहेर पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सविस्तर वाचा पूरग्रस्त आळंदीसाठी राज्य शासनाचा मोठा निर्णय:विविध विकास कामांसाठी नगरविकास विभागाकडून 10 कोटींचा विशेष निधी मंजूर! गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि आलेल्या महापुरामुळे श्रीक्षेत्र आळंदी येथील नागरी व पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, तेथील पायाभूत सुविधांच्या पुर्नउभारणीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने १० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. ही सर्व विकासकामे तातडीने आणि युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांना दिले आहेत. सविस्तर वाचा
Source link
राज्यात पावसाचा धुमाकूळ:पुणे-साताऱ्याच्या घाटमाथ्यावर हायअलर्ट; मुंबई, नाशकात जोर ओसरला, वाचा तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय?