Headlines

फडणवीसांनी गृहमंत्रीपद झेपत नसेल तर तसे सांगावे, दिल्लीतून कारभार चालतोय?:ते दिल्लीला मुख्यमंत्रीपदाची 50 टक्के किंमत मोजून ते मोकळे झालेत; राऊतांचा शिंदेंवर नाव न घेता गंभीर आरोप




देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल तर त्यांनी तसे सांगावे की मला हे पद झेपत नाही, किंवा माझे गृहमंत्रीपद मी चालवत नसून दिल्लीतील कोणीतरी चालवत आहे ते गुंडगिरीला समर्थन देत आहे हे त्यांनी समोर येत सांगितले पाहिजे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील इतर काही भाग विकून जी संपत्ती गोळी केली जात आहे ती राजकारणात आणली जात आहे. त्यांचा एकच उद्देश आहे की मला मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यासाठी दिल्लीला किंमत मोजण्यासाठी ते तयार आहेत. त्यांनी त्यापैकी 50 टक्के किंमत मोजली आहे, असा दावा करत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंचे नाव न घेता केला आहे. तुम्ही सांगताल त्या किंमतीला मला मुख्यमंत्रीपद हवे आहे अशी बोली त्यांनी लावली आहे. यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हतबल झालेले दिसत आहेत. भस्मासूर, शहा-फडणवीसांच्या मानेवर बसतील संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना भस्मासूर म्हणत ते अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मानेवर बसल्याशिवाय राहणार नाहीत. काल उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या आमदारांच्या बैठकीला 20 पैकी 19 आमदार उपस्थित होते. परभणीचे राहुल पाटील हे जिल्हा बँकेच्या निवडणुकीमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी तशी परवानगी घेतली होती. 19 आमदार उपस्थित असलेल्या बैठकीत आमदारांच्या भावना समजून घेतल्या. कालच्या बैठकीत एसआयआरबद्दल चर्चा झाली. तर राम मंदिर लुटीसंदर्भात काल चर्चा झाली. आता आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन करणार आहोत. पुढच्या आठवड्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन संजय राऊत म्हणाले की, नागपूरमध्ये शिवसेनेचे पुढच्या आठवड्यात आंदोलन आहे. त्यासाठी मी आणि अंबादास दानवे नागपुरात जाणार आहोत त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही आंदोलन करणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनाला उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित राहणार आहेत. तर जिल्हा बँकेकडे राजकारणाच्या दृष्टीने पाहू नये. सहकार क्षेत्रात राजकारण नसते. पण सध्या निवडून येणं महत्त्वाचे आहे, असे म्हणत अंबादास दानवेंचा जिल्हा बँक निवडणुकीवर भाष्य केले आहे. शिंदे गट नाही, ती गुंडांची गँग संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील सहाव्या माळावर गृहमंत्रीपदाची पुजा घालावी. राज्यात ज्या पद्धतीने कायद्याचे राज्य कोलमडले आहे त्यात ते ज्या पद्धतीने केवळ विरोधकांवर टीका करण्यात वेळ घालवत आहेत. कोरोना काळात ज्या डॉक्टरांनी आपले प्राण वाचवले त्यांच्यावर नगरसेवक हात टाकतात, महिलांना मारहाण करतात. महिलांना मारहाण करणाऱ्या गुंडावर कारवाई केली पाहिजे. शिंदे गट नाही तर गँग आहे सगळे गुंड शिंदेंकडून पोसण्यात येत आहे. अयोध्येसारखे महाराष्ट्रात गुंडांच्या टोळ्या निर्माण होत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *