![]()
पावसाळी अधिवेशनात आज सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या आणि तितक्याच गंभीर प्रश्नांवरून विधानसभेत मोठी चर्चा पाहायला मिळाली. एकीकडे राज्यातील डॉक्टरांच्या वाढत्या निष्काळजीपणामुळे रुग्णांच्या जिवाशी होत असलेल्या खेळाचा मुद्दा सभागृहात आक्रमकपणे उपस्थित करण्यात आला; तर दुसरीकडे, प्रगत महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये अंत्यविधीसाठी साधी ‘स्मशानभूमी’ उपलब्ध नसल्याचे विदारक वास्तव सभागृहात मांडण्यात आले. दरम्यान, अनधिकृत वाहतूक आणि RTO मधील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काल विरोधकांनी सरकारला जोरदार धारेवर धरले होते. याची गंभीर दखल घेत सरकारने काल सभागृहात दोन मोठे आणि धडक निर्णय जाहीर केले. बेकायदेशीर चालणाऱ्या बाईक-टॅक्सी आणि अनधिकृत वाहतुकीला लगाम घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘डोमिसाईल सर्टिफिकेट’ सक्तीचे करण्याची मोठी घोषणा केली. तर दुसरीकडे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ऑडिओ क्लिपसह उघड केलेल्या RTO मधील कथित वसुली रॅकेटच्या थेट ‘एसआयटी’ (SIT) चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कालच्या सत्रात जळगाव जामोद येथील एका निर्दोष आदिवासी पिता-पुत्राला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवून अमानुष छळ केल्याचा मुद्दाही प्रचंड गाजला. आमदार रोहित पवार यांनी हा विषय आक्रमकपणे उचलून धरत दोषी पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी केली. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांचे हे कृत्य ‘अतिशय लाजिरवाणे’ असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई आणि सेवेतून निष्कासित करण्याचे मोठे आश्वासन दिले. याशिवाय, कालच्या कामकाजात नागरिकांना जलद न्याय देण्यासाठी राज्यात १३८ जलदगती न्यायालये उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा, मालाडमधील शाळेतील हिंदू देवतांच्या फोटोंचा वाद आणि ‘मिसिंग लिंक’वरील दरड दुर्घटनेसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा पार पडली. या सर्व पार्श्वभूमीवर आजच्या १२ व्या दिवसाच्या कामकाजातही दोन्ही सभागृहांत मोठे आणि महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे अपडेट्स पाहण्यासाठी खालील लाइव्ह ब्लॉगमधून जा..
Source link
पावसाळी अधिवेशनाचा बारावा दिवस:डॉक्टरांचा निष्काळजीपणा, गावांमध्ये स्मशानभूमीच नसल्याचा मुद्द्यावरुन विधानसभेत खडाजंगी