Headlines

7 सप्टेंबरला ठाकरे गटातील 15 आमदार जाणार:हिंदुस्थानी भाऊचा दावा, संजय राऊतांना 'भांडुपचा खोटा अनिल कपूर' म्हणत टोला




शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित दान चोरीच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी ‘रामरक्षा आंदोलन’ पुकारले आहे. दुसरीकडे सोशल मीडियावरील प्रसिद्ध रीलस्टार ‘हिंदुस्थानी भाऊ’ याने एक दावा केला आहे. येत्या ७ सप्टेंबरला ठाकरे गटाचे तब्बल १५ आमदार आणि २५ नगरसेवक पक्ष सोडणार असल्याचा मोठा दावा त्याने इन्स्टाग्रामवर एका व्हिडीओद्वारे केला आहे. तसेच, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका करत त्यांचा उल्लेख ‘भांडुपचा खोटा अनिल कपूर’ असा केला आहे. ‘सचिन भाऊ अहिर पहिला बॉम्ब, ७ तारीख लक्षात ठेवा!’ इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये हिंदुस्थानी भाऊने थेट उद्धव ठाकरेंना उद्देशून इशारा दिला आहे. तो म्हणाला, “उद्धव साहेब, जय महाराष्ट्र, जय श्रीराम! मी याआधीही बोललो होतो, सांभाळा… नाहीतर पंधरा आमदार आणि पंचवीस नगरसेवक जायच्या मार्गावर आहेत. सचिन भाऊ अहिर हा पहिला बॉम्ब फुटला आहे आणि सप्टेंबरपर्यंत अजून खूप काही जाणार आहे. ७ सप्टेंबर ही तारीख आठवणीत ठेवा.” या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. संजय राऊतांना लगावला टोला याच व्हिडीओमध्ये हिंदुस्थानी भाऊने खासदार संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला. राऊतांच्या ‘तुडवा ऑपरेशन’ या वक्तव्याचा संदर्भ देत तो म्हणाला, “तुमचा अनिल कपूर काय बोलतोय? आता ‘तुडवा ऑपरेशन’ चालू करणार? अरे, सचिन भाऊ अहिर कोण आहे? दगडी चाळ, अरुण भाई गवळी उर्फ डॅडी यांचे नाव ऐकले आहे ना? बाळासाहेब म्हणायचे, तुमच्याकडे दाऊद असेल तर आमच्याकडे गवळी आहे. हा भांडुपचा खोटा अनिल कपूर आहे ना, याला आता तरी तोंड बंद करायला सांगा, नाहीतर याचेच ‘तुडवा ऑपरेशन’ चालू होईल.” ठाकरेंचे ‘रामरक्षा आंदोलन’ आणि हिंदुत्वाची साद दरम्यान, ऑपरेशन टायगर आणि सचिन अहिर यांच्या पक्षत्यागामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी उद्धव ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या मुद्द्यावरून त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “आम्ही हिंदू भोळे आणि भाबडे आहोत, पण मूर्ख नाही. तुम्ही आमचे धनुष्यबाण चोरले, पण हनुमानाच्या मशालीने जशी रावणाची लंका जाळली, त्याच मशालीने आम्ही अन्यायाची लंका जाळू,” असा घणाघात ठाकरेंनी केला. हिंदुस्थांनी भाऊने इन्साग्रामवर पोस्ट केलेला व्हिडिओ.. हेही वाचा.. राज्यात पावसाचा धुमाकूळ:पुणे-साताऱ्याच्या घाटमाथ्यावर हायअलर्ट; मुंबई, नाशकात जोर ओसरला, वाचा तुमच्या जिल्ह्यात पावसाची स्थिती काय? राज्यात गेल्या पाच दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. संपूर्ण जून महिन्याची पावसाची तूट जुलैच्या पहिल्या आठवड्यातच भरून निघाली आहे. एकीकडे नाशिकवरील ढगफुटीचे संकट टळून मुंबईला पावसापासून थोडा दिलासा मिळाला असला, तरी पुण्यात मात्र परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीत तब्बल २७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने पुण्यातील एकता नगरमध्ये पाणी शिरले आहे. हवामान विभागाने पुणे, सातारा आणि घाटमाथ्यावर आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सविस्तर वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *