Headlines

अमळनेर शिवारामध्ये शेतकऱ्यांचे रात्रीपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरू:जायकवाडी जल फुगवट्याचे पाणी थेट शेतात असल्याचा केला आरोप‎




जायकवाडी जल फुगवट्याचे पाणी वीस वर्षांपासून असंपादित अमळनेर-लखमापूरच्या शेतात येत असून, उभी पिके मातीमोल झाली आहे. प्रशासन वेळकाढू भूमिका घेत असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी अमळनेर शिवारात सोमवारी (१८ मे) सकाळी साडेअकरा वाजेपासून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जायकवाडी जल फुगवट्यामुळे उभ्या पिकांचे १०० टक्के नुकसान होते. याबाबत जलसंपदा विभाग “फाईल भूमी अभिलेखकडे’ तर भूमी अभिलेख “आमचा संबंध नाही’ असे सांगून उडवाउडवीची उत्तरे देत आहे. सोमवारी शेतकरी कुटूंबासह पाण्यात उतरले आहेत. या आंदोलनात इसाभाई पठाण, राधेश्याम कोल्हे, बालचंद पंडीत, कडूबाबा पठाण, शिवाजी दरगुडे, समद पठाण, विक्रम पंडीत, मुनीर पठाण, जनार्धन मिसाळ, भाऊसाहेब पंडीत, गणेश मिसाळ सहभागी आहेत. प्रशिक्षणार्थी तहसीलदार सागर वाघमारे, उपविभागीय अभियंता दीपककुमार डोंगरे, गंगापूर पोलिस घटनास्थळी दाखल होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *