- Marathi News
- National
- Monsoon, In Kerala Between May 22 And 26, Will Be More Continental This Year, Will Cover The Country Late
अनिरुद्ध शर्मा | नवी दिल्ली29 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

नैऋत्य मान्सून सध्या अंदमान-निकोबार द्वीपसमूहाच्या दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंटपासून ते उत्तरेकडील टोकावर लँडफॉलपर्यंत पसरला आहे. मान्सून रेषेचे पश्चिमेकडील टोक हिंदी महासागरात मालदीव ओलांडून श्रीलंकेच्या कोलंबोजवळून जात आहे, तर आग्नेय टोक बंगालच्या उपसागरात बरसत आहे.
हवामान विभागाचा अंदाज आहे की, परिस्थिती अनुकूल होत गेल्यास मान्सून २२ मे रोजी केरळममध्ये धडकू शकतो आणि तसे न झाल्यास ३० मेपर्यंत दाखल होईल. हे मान्सून आगमनाच्या निश्चित तारखेच्या म्हणजेच १ जूनच्या आधी होईल.
धरणी तापली : देशात येणारे ६ दिवस भीषण उष्णतेचे
नवी दिल्ली | २४ मेपर्यंत देशाचा मोठा भाग भीषण उष्णतेने होरपळून निघेल. खाजगी हवामान संस्था स्कायमेटने असा अंदाज वर्तवला आहे की, यादरम्यान ईशान्य आणि दक्षिण द्वीपकल्पातील काही भाग वगळता जवळपास निम्म्या देशात उष्माघाताचा प्रकोप राहील.

प्रतीक्षा : ३५ ते ३८ दिवसांत देश व्यापतो, या वेळी ७० दिवस लागू शकतात…
१२ ठिकाणी: पंजाब, हरियाणा, चंदीगड, तेलंगण, दिल्ली, राजस्थान, गुजरात, यूपी, म. प्र., छत्तीसगड राज्य, विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट राहील.
धोका जास्त : राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, एमपी, यूपी, तेलंगणा, आंध्र, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा आणि दिल्ली. आयएमडीने या वेळी तसेही संपूर्ण हंगामात सामान्य सरासरीपेक्षा ८% कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोणत्या महिन्यात किती पाऊस कमी
स्कायमेट वेदरचे अध्यक्ष जी. पी. शर्मा म्हणतात की, या वेळी मान्सूनवर २००२ सारखा धोका दिसत आहे.