![]()
तालुक्यातील भादवन येथे गिरणा नदीकाठावरील शेत परिसरात गेल्या चार महिन्यांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अवघ्या सहा तासांत जेरबंद झाला. शेतकरी कैलास पांडुरंग जाधव यांच्या शेतातील घराजवळ रविवारी रात्री पिंजरा लावण्यात आला होता. मात्र परिसरात अजून एक बिबट्या असल्याने तत्काळ दुसरा पिंजरा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. भादवन येथील गट क्रमांक २६६ मध्ये कैलास जाधव यांचे फार्म हाऊस, गोठे, पोल्ट्री शेड व कांदा चाळ आहे. डिसेंबरपासून या परिसरात नर व मादी बिबट्यांचा वावर वाढला होता. या काळात बिबट्याच्या हल्ल्यात दुभती म्हैस, दोन बैल व पारडी दगावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ^बिबट्याच्या हल्ल्यांत माझी जनावरे दगावल्याने सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र गेल्या चार महिन्यांपासून अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळालेली नाही. शासनाने तातडीने मदत द्यावी. कैलास जाधव, नुकसानग्रस्त शेतकरी
Source link
भादवन परिसरात सहा तासांत बिबट्या जेरबंद:आणखी बिबट्या असल्याने दुसऱ्या पिंजऱ्याची मागणी