Headlines

Insurance scam; No food to eat at home, insurance worth Rs 1.5 crores!, Bhaskar finds 71 such cases in 15 episodes


  • Marathi News
  • National
  • Insurance Scam; No Food To Eat At Home, Insurance Worth Rs 1.5 Crores!, Bhaskar Finds 71 Such Cases In 15 Episodes

अजय रावत/ जसराज ओझा | भिलवाडा/ अहमदाबाद2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गरीब, आजारी आणि असहाय… पण जेव्हा यांचा मृत्यू होतो, तेव्हा २५ लाख, ५० लाख, ८० लाख आणि कोट्यवधी रुपयांचे विमा क्लेम समोर येतात. खरे तर, गुजरात आणि राजस्थानमध्ये विमा एजंट्सची एक टोळी सक्रिय आहे. ही टोळी अशाच लोकांचा शोध घेते, ज्यांना दारूचे व्यसन आहे किंवा किडनीचा एखादा आजार आहे. सुरुवातीला ते या लोकांचा विमा काढतात, त्याचे हप्तेही स्वतःच भरतात आणि नंतर जेव्हा त्यांचा नैसर्गिक मृत्यू होतो, तेव्हा त्याला अपघात भासवून अपघाती विम्याचा क्लेम घेतात.

भास्कर टीम तपासासाठी अहमदाबादला पोहोचली. येथील १५ झोपडपट्ट्यांमध्ये ७१ लोकांचे बोगस विमा काढल्याचे आढळले. जे लोक मृत्यूच्या दारात आहेत, अशा व्यसनी आणि असहाय लोकांना विमा एजंट लक्ष्य करतात. अहमदाबादमधील साबरमती येथे भावेश भाई यांच्या घरी गेलो, तेव्हा चाळीबाहेर एक दुकानदार भेटला. तो म्हणाला, हे लोक दारू पितात. त्यामुळे त्यांचा विमा काढून क्लेम लाटला जातो

राजस्थानमध्ये अपघाती विम्याचे अतिरिक्त ५ लाख रुपये मिळतात. त्यामुळे तिथे विजेचा धक्का लागल्याचे किंवा विहिरीत पडल्याचे भासवले जाते. भिलवाडाच्या मांडलमध्ये दीपकचे जे प्रकरण उघडकीस आले, त्यातही विजेचा धक्का लागल्याचे भासवण्याची योजना होती. शवविच्छेदन कुठे होणार, हेदेखील आधीच ठरले होते. मात्र, एका डॉक्टरच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्याने पोलिसांना बोलावले. तपासानुसार, हे आरोपी या लोकांच्या उत्पन्नाचा पुरावा म्हणून बोगस आयटीआर सादर करत असत.

केस-1 : शॉकने मृत्यू झाल्याचे सांगण्यासाठी बोटे जाळली

अहमदाबादच्या नरोडात राहणाऱ्या दीपक गोहेलच्या (३६) घरात वृद्ध आई व ११ वर्षांचा मुलगा दिव्यांश आहे. पत्नीचा ४ वर्षांपूर्वी मृत्यू झाला. दीपक व्यसनी. याचाच फायदा घेऊन दीड कोटींचे ६ विमे काढले. हप्तेही भरले. मरणासन्न अवस्थेत त्याला भिलवाड्याला आणले. मृत्यू झाल्यावर पाय व हाताची बोटे जाळली, जेणेकरून शॉक लागल्यासारखे वाटेल.

केस-२ : पत्र्यांचे घर, विमा ४० लाखांचा कलोल भागातील करण जस्सू भाई ३२ वर्षांचे आहेत. येथे चाळीत विचारपूस केली असता, सुरुवातीला या नावाचे कोणीही राहात नसल्याचे सांगण्यात आले. नंतर एकाने सांगितले की हे करणचे घर आहे. तिथे केवळ पत्रे लावलेले आहेत. तो खूप दारू पितो, त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली. आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. तो घरात एकटाच असतो, त्यामुळे महिन्यातून एखाद्या वेळीच येतो. त्याचाही सुमारे ४० लाखांचा नॉन-अॅक्सिडेंटल विमा आहे.

आरोपी अहमदाबादचा विमा एजंट सूरज, ज्याचे राजस्थानात नेटवर्क

हा अहमदाबादचा विमा एजंट सूरज विश्वास आहे. त्याने भिलवाडा आणि अहमदाबादमधील ६ लोकांच्या ३६ पॉलिसी काढल्या. अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयाबाहेरही या टोळीचे नेटवर्क आहे. गेट नंबर ३ च्या ओपीडीबाहेर सुरक्षारक्षकाला विमा काढण्याबाबत विचारले असता, त्याने कोणाला तरी फोन करून बोलावले. तो म्हणाला, आम्ही रोजच विमा काढतो. राजस्थान तर सोडाच, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रापर्यंत आमची माणसे आहेत, जी विमा काढून क्लेम मिळवून देतात.

भास्कर टीम दीपकचे गाव नरोडा येथे पोहोचली. ३ दिवसांत गांधीनगर, मणिनगर, नरोडा, कुबेरनगरसह १५ ठिकाणे पिंजून काढली. ही झोपडपट्टीतील घरे आहेत. औषध-रेशनसाठीही पैसे नाहीत, त्यांचा २५ लाखांपासून दीड कोटींपर्यंतचा विमा आहे.

1. युनायटेड इंडिया इन्शुरन्स ~15 लाख 2. स्टार हेल्थ इन्शुरन्स ~20 लाख 3. ओरिएंटल इन्शुरन्स ~25 लाख 4. श्रीराम जनरल इन्शुरन्स ~15 लाख 5. आदित्य बिर्ला कॅपिटल ~50 लाख 6. नीवाभूपा ग्रुप इन्शुरन्स~31.5 लाख

बातमीशी संबंधित ऑडिओ-व्हिडिओ, फोटो सर्व भास्करकडे आहेत. QR मध्ये पाहा.

बातमीशी संबंधित ऑडिओ-व्हिडिओ, फोटो सर्व भास्करकडे आहेत. QR मध्ये पाहा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *