Headlines

दिव्यज्योतच्या घोटाळ्यातील संशयिताला पोलिस कोठडी; आकडा 75 लाखांवर




विंचूर येथील दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेमार्फत महिलांना विविध वस्तू व सरकारी अनुदान मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी लासलगाव पोलिसांत दाखल गुन्ह्यातील संशयित विशाल गरुड याला न्यायालयाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सोमवारी (दि. १८) सुमारे १३ लाख रुपयांच्या नव्या तक्रारी दाखल झाल्याने फसवणुकीची एकूण रक्कम ७५ लाख रुपयांहून अधिक झाली आहे. दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेने केंद्र सरकारच्या विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांना अनुदान मिळवून देण्याच्या बहाण्याने निफाड, येवला, चांदवड, नांदगाव, सिन्नर आदी तालुक्यांतील बचत गटांच्या महिलांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दररोज नवीन तक्रारी दाखल होत आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित संजय बोराळे व त्याची पत्नी जयश्री बोराळे यांचा अद्याप शोध लागलेला नाही. सरकारी अनुदानाच्या आशेवर फसवणूक दिव्यज्योत बहुउद्देशीय संस्थेकडून बचत गटातील महिलांना विविध वस्तू देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. एकूण रकमेपैकी केवळ २५ टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित निधी शासनाच्या सीएसआर फंडातून उपलब्ध करून वस्तू दिल्या जातील, असे सांगण्यात येत होते. या आमिषाला हजारो महिला बळी पडल्याने अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *