Headlines

चांदवडला ‘कुस्ती आपल्या‎दारी’ अभियानाला प्रतिसाद‎:कुस्ती विकास मार्गदर्शन मेळाव्यात तालुक्यातील पहिलवानांचा सन्मान




चांदवड जिल्हा तालीम संघाने राबविलेल्या ‘कुस्ती आपल्या दारी’ या अभियानात चांदवड येथे कुस्ती विकास मार्गदर्शन मेळावा झाला. कुस्ती परंपरेचा वारसा जपत ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत पैलवान घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष ॲड. गोरखनाथ बलकवडे, उत्तर महाराष्ट्र तालीम संघाचे अध्यक्ष, सुवर्णपदक विजेते उत्तमराव दळवी, माजी प्राचार्य रवींद्र मोरे, राष्ट्रीय पंच चेतक बलकवडे तसेच एनआयएस कुस्ती प्रशिक्षक अमोल आहिरे यांनी कुस्तीचा विकास, ग्रामीण भागातील युवकांना प्रशिक्षणाची संधी आणि भविष्यात राष्ट्रीय दर्जाचे पैलवान तयार करण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. चांदवड तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पैलवान विजय गांगुर्डे यांच्याहस्ते तालुक्यातील आजी-माजी राष्ट्रीय व राज्यस्तरीय पैलवानांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय कुस्तीगीर वेदांत ईश्वर देवरे, संदीप बिन्नर, ऑल इंडिया चॅम्पियन कुमारी पैलवान समीक्षा बापू पवार, ज्ञानेश्वरी जोशी, ऑल इंडिया चॅम्पियन विराज गांगुर्डे आदी नामवंत पैलवानांचा गौरव करण्यात आला. बाजार समितीचे संचालक वाल्मीक वानखेडे, दत्ता गांगुर्डे, म्हसू गागरे, प्रकाश शेळके, सोमनाथ पारखे, ईश्वर देवरे, गोकुळ देवरे, प्रा. निंबाळकर, अशोक झाल्टे, वसंत पगार, अर्जुन जाधव, गंगा पैलवान गंगाराम जाधव यांच्यासह तालुक्यातील पैलवान उपस्थित होते. चांदवड येथे ‘कुस्ती आपल्या दारी’ उपक्रमात सहभागी कुस्तीगीर, तसेच उपस्थित पदाधिकारी.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *