![]()
बालपणात मिळालेले संस्कार हेच व्यक्तिमत्त्व घडवतात. सुसंस्कारित विद्यार्थी हेच सक्षम राष्ट्राचे भविष्य असतात, असे मत आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी व्यक्त केले. ते, माटरगाव येथे आयोजित बालसंस्कार शिविर समारोप प्रसंगी बोलत होते. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी माटरगावात मागील अनेक वर्षापासून बालसंस्कर शिबिर घेतल्या जात आहे. नुकतेच प्रारंभ करण्यात आलेले शिबिराचा समारोप यावेळी करण्यात आला. तेव्हा त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या शिबिराचे आयोजन श्री गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या वतीने प्रारंभ करण्यात आले होते. यावेळी समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अध्यात्म केंद्र गुरुकुंज मोझरीचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर उपस्थित होते. यावेळी हभप ज्ञानेश्वर महाराज मिरगे, अनंतराव आळशी, मनोज वानखडे, विजय काटोले, इनायत खाँ, राजा देवचे, अक्षय मिरगे आणि शिवाजीराव देठे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. दरम्यान शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेम, नैतिक मूल्ये, शिस्त, योग, व्यायाम तसेच आध्यात्मिक जीवनशैलीचे प्रशिक्षण देण्यात आले. शिबिराच्या या कालावधीत पार पडलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. यावेळी माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रभावना आणि सामाजिक बांधिलकी यांची जाणीव तरुण पिढीत निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. अशा शिबिरांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक जाणीव विकसित होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिबिराच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी मल्लखांब, लाठी-काठी, लेझीम आणि तबला वादन यांसारख्या विविध कलाप्रकारांचे सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली. कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. दहा दिवसांच्या या शिबिरात योग, व्यायाम, सामूहिक प्रार्थना, राष्ट्रभक्तीपर उपक्रम, सांस्कृतिक प्रशिक्षण आणि विविध बौद्धिक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमात एकूण ८५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन मनीष देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन संकेत मुरे यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. सामूहिक प्रार्थना व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश विद्यार्थ्यांच्या मानसिक शांततेसाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिबिरात रोज सामूहिक प्रार्थना घेतली जात असे. प्रार्थनेमुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न आणि पवित्र होत असे. याशिवाय, संध्याकाळच्या सत्रात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सामूहिक प्रार्थना व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश विद्यार्थ्यांच्या मानसिक शांततेसाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिबिरात रोज सामूहिक प्रार्थना घेतली जात असे. प्रार्थनेमुळे संपूर्ण वातावरण प्रसन्न आणि पवित्र होत असे. याशिवाय, संध्याकाळच्या सत्रात विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशभक्तीपर गीतांचे गायन, लहान नाटिका आणि वक्तृत्व स्पर्धांचा समावेश होता. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा रंगमंचावरील आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली.
Source link
बालपणामध्ये मिळालेले संस्कार हेच व्यक्तिमत्त्व घडवतात- आचार्य वेरुळकर:माटरगावात बालसंस्कार शिबिराचा समारोप; मान्यवरांचा सहभाग