Headlines

टँकरमुक्तीसाठी 836 गावांत 15 हजार 348 उपाययोजना:विहिर जलस्त्रोत असलेल्या गावातील योजनांचे होणार बळकटीकरण, उपाययोजना सुचवल्या‎




एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसाचे प्रमाण घटणार असून, जिल्ह्याला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. ज्या पाणी योजनांना विहिर जलस्त्रोत आहे, त्या विहिरी कोरड्या पडल्याने तेथील पाणी योजना बंद होऊन, टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. हे चित्र बदलवून, टँकरमुक्तीसाठी ८३६ गावांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणाद्वारे १५ हजार ३४८ उपाय योजना करण्यासाठी जिल्हा परिषदेने आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला शासनाने मंजुरी दिल्यास भूजलपातळी वाढणार आहे. जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात टँकरची मागणी वाढते. त्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात विहिरीवर अवलंबून असलेल्या स्वतंत्र पाणी योजना बंद पडतात. या योजना सुरळीत ठेवण्यासाठी तसेच खालावलेली भूजलपातळी सूस्थितीत आणण्यासाठी उपाय योजना सुचवण्यात आल्या आहेत. टँकरची १५ मेपर्यंत वाढल्याचे दिसून आले असून, सद्यस्थितीत ७३ टँकरद्वारे ९२ गावांना पाणीपुरवठा होत आहे. जून महिन्यात पावसाला सुरूवात झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने जुलैअखेर टँकरची संख्या कमी होताना दिसून येते. हे चित्र बदलवून टाकण्यासाठी एलनिनोच्या पार्श्वभूमीवर आराखडा महत्वपूर्ण ^ एलनिनोच्या पार्श्वभूमीवर पावसात मोठा खंड पहायला मिळणार आहे. अशा स्थितीत पडणारे पावसाचे पाणी साठवून, भूजल पातळी वाढवणे आवश्यक आहे. जर हे शक्य झाले, तर भूजलाचा अतिउपसा असलेली सुमारे ८० टक्के गावे सेफ झोनमध्ये आणता येतील. या आराखड्याद्वारे १६७२जलस्त्रोतांचे बळकटीकरण शक्य आहे. तसेच ८३६ गावे टँकरमुक्त करणे शक्य होईल. -अजिंक्य काटकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *