Headlines

गायीचे शेण आणि गोमुत्र शेतीसाठी आहे शुद्ध सोनं:शेतीचे अर्थकारण बदलण्यासाठी हवा योग्य वापर




“शेतकरी जोपर्यंत गाईला समजून घेत नाही, तसेच गाईच्या शेणाचा आणि गोमूत्राचा योग्य वापर करत नाही, तोपर्यंत शेतीचे खरे अर्थकारण फायद्याचे होणार नाही. गोमूत्र हे लाखो रुपयांची धनदौलत आहे. रासायनिक खतांच्या तुलनेत ते शुद्ध सोन्यासारखे आहे. गाईचे महत्त्व शेतकऱ्यांना समजले, तर शेती आणि शेतकऱ्यांचे भविष्य निश्चित बदलू शकते, असे प्रतिपादन गोसेवक परमेश्वर तळेकर यांनी व्यक्त केले. ग्राम सुधार समितीच्या माध्यमातून कोटलींग मंदिर चिखलठाण येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘जिव्हाळा ग्रुप’च्या स्नेहमेळाव्यात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. तळेकर पुढे म्हणाले की, रासायनिक खतांच्या अतिरेकामुळे केवळ शेतीच नव्हे तर माणसांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. जर निरोगी जीवन हवे असेल, तर देशी गाई आणि सेंद्रिय शेतीचा स्वीकार करावा लागेल. आज लोक डॉक्टरांवर हजारो रुपये खर्च करतात; पण स्वतःच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या पारंपरिक आणि नैसर्गिक उपायांकडे दुर्लक्ष करतात. हीच परिस्थिती बदलण्याची गरज आहे. कार्यक्रमात राजेंद्र बारकुंड यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर गजेंद्र पोळ यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राजेंद्र रणसिंग, निळकंठ ताकमोगे, प्रशांत नाईकनवरे, कैलास लबडे, सचिन गव्हाणे, आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते. विज्ञान अन् अध्यात्माची सांगड घाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष सुराणा हे होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालण्याची गरज अधोरेखित केली. “विज्ञान आणि अध्यात्म या दोन्हींचा समतोल साधत वाटचाल केली, तरच समाजाची खरी प्रगती होईल. अंधश्रद्धेला खतपाणी घातले, तर कोणाच्याही जीवनाचे कल्याण होणार नाही,



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *