![]()
“प्रभू श्री रामाचे आदर्श आचरण, भगवान श्रीकृष्णाची अचूक नीती आणि अखंड हरिस्मरण-नामसंकीर्तन यातच मानवाच्या आनंदी आणि समाधानी जीवनाचे खरे गमक दडलेले आहे,” असे निरुपण गायक तथा वक्ते राजेंद्र टाक यांनी केले. पारनेर तालुक्यातील आनंदाश्रम (रायतळे) येथे आयोज
.
या कथा श्रवण सोहळ्यासाठी रायतळे आणि परिसरातील पंचक्रोशीतून अनेक साधुसंत तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील नामवंत मंडळी उपस्थित होती. आश्रमाच्या वतीने ह.भ.प. राघवानंद महाराज यांनी देवस्थानच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांची माहिती दिली. या सोहळ्याला सुपा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक (पीआय) गडकरी मॅडम, भाजप पारनेर तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोहळ्यात दररोज हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. आश्रमाच्या सर्व साधकांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. कथा सांगतेच्या प्रसंगी उद्योजक बापूसाहेब डोके यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.