![]()
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे असून अशा कार्यक्रमांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे प्रतिपादन रणजित शिंदे यांनी केले. माढा तालुक्यातील मानेगाव येथे भारतीय जनता पक्ष ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. राजकीय क्षेत्रासोबत सामाजिक बांधिलकी जपत गुणवंतांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. मानेगावातील युवकांनी आयोजित केलेला हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी असल्याचे सभापती पंडितकाका देशमुख भाषणात म्हणाले. बाजार पटांगण परिसर आकर्षक सजावट, रोषणाई व स्वागत फलकांनी उजळून निघाला होता. तालुक्यातील अनेक राजकीय नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, युवक व विविध गावांमधून आलेल्या नागरिकांच्या अलोट उपस्थितीमुळे या कार्यक्रमाने संपूर्ण परिसराचे लक्ष वेधून घेतले. राजकीय व्यासपीठावरून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव करण्यात आल्याने उपस्थितांकडून मोठे समाधान व्यक्त करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थी, नवोदय विद्यालयात निवड झालेले विद्यार्थी, महाराष्ट्र पोलिस भरतीत यश संपादन केलेले युवक-युवती, डॉक्टर झालेले विद्यार्थी, कृषी अधिकारी पदावर निवड झालेले युवक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर, या सर्व गुणवंतांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, सत्कारानंतर काही गुणवंत विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत आपला यशाचा प्रवास सांगितला. विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास, पालकांचे मार्गदर्शन व शिक्षकांचे सहकार्य यामुळे यश मिळाल्याचे सांगत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून मेहनत घ्यावी, असे आवाहन केले. या सोहळ्याला माढा तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भाजप नेते रणजित शिंदे, प्रा. शिवाजीराव सावंत, माजी समाजकल्याण सभापती शिवाजीराजे कांबळे, चेअरमन दादासाहेब साठे, योगेश पाटील आदींची उपस्थिती होती. सामाजिक भान जपणारा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर मोठे यश संपादन करावे, यासाठी अशा सत्कार सोहळ्यांची प्रेरणा महत्त्वाची ठरतेयुवकांनी राजकीय व सामाजिक भान जपत केलेला हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. पृथ्वीराज सावंत, जिल्हा परिषद सदस्य
Source link
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य व्यासपीठ मिळणे गरजेचे:मानेगावात गुणवंतांचा गौरव, ग्रामस्थांच्या वतीने विविध क्षेत्रांतील यशस्वींतांचा सत्कार