Headlines

Bangladesh hands over two ports to America, exchange of confidential information, US entry through 3 agreements in four months


  • Marathi News
  • National
  • Bangladesh Hands Over Two Ports To America, Exchange Of Confidential Information, US Entry Through 3 Agreements In Four Months

अमानुर रहमान3 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

बांग्लादेश आणि अमेरिकेदरम्यान गेल्या चार महिन्यांत तीन महत्त्वाचे करार झाले आहेत. त्यातील पहिला व्यापार करार ‘आर्ट’ (अ‍ॅग्रीमेंट ऑन रिसिप्रोकल ट्रेड) असून उर्वरित दोन करार ‘अक्सा’ आणि ‘जिसोमिया’ हे संरक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत. या करारांमुळे अमेरिकेला बांग्लादेशातील चटगाव आणि मतारबारी या दोन सामरिक बंदरांपर्यंत लष्करी प्रवेश मिळण्याचा मार्ग खुला होत आहे.

अक्सा करार लागू झाल्यानंतर अमेरिकन नौदलाची युद्धनौका आणि लष्करी विमाने या बंदरांसह संबंधित एअरबेसचा वापर रसद पुरवठा, इंधन भरणे, दुरुस्ती, देखभाल आणि जवानांच्या हालचालींसाठी करू शकतील. दुसरीकडे, जिसोमिया करारानुसार दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोपनीय लष्करी आणि गुप्तचर माहितीची देवाणघेवाण होईल. त्यामुळे बांग्लादेश व्यापार भागीदारीच नव्हे तर लष्कराचा महत्त्वाचा टप्पा बनू शकतो.

इकडे… पाककडून दोन जेएफ-१७ जेट

पाकिस्तानने बांग्लादेश हवाई दलाला दोन जेएफ-१७ फायटर जेट सिम्युलेटर सुपूर्द केले आहेत. बांग्लादेशी वैमानिकांचे प्रशिक्षण आणि विमान संचालनाच्या तयारीसाठी हे सिम्युलेटर देण्यात आले आहेत. जेएफ-१७ हे विमान पाकिस्तान आणि चीनने संयुक्तपणे विकसित केले आहे.

धमकी… आयात कर सवलतीसाठी करार

बांग्लादेशची अर्थव्यवस्था रेडीमेड गारमेंट उद्योगावर अवलंबून आहे. अमेरिकेने याच बाजूचा दबावासाठी वापर केला. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट संकेत दिले होते की संरक्षण करार झाले नाहीत, तर १९% टॅरिफ सवलत आणि ड्युटी-फ्री कोटा रद्द केला जाईल.

चिंता… त्रिपुरापासून ८० किमीवर मतारबारी बंदर

चटगाव व मतारबारी ही बंदरे बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात आहेत. चटगाव हे त्रिपुरातील सबरूम भागापासून ८० किमी, तर मतारबारी १५० किमी अंतरावर आहे. यामुळे भारताच्या ईशान्य भागाजवळ अमेरिकन नौदल अधिक काळ तैनात राहू शकते.

मलक्का खाडीत तणाव शक्य… जगातील ६०% व्यापार याच मार्गाने

  • मलक्का सामुद्रधुनी हिंद महासागराला प्रशांत महासागराशी जोडते. हा जगातील सर्वाधिक वर्दळीचा सागरी मार्ग व सामरिक ‘चोकपॉइंट’ मानला जातो. जगातील ६०% व्यापार याच मार्गाने होतो.
  • भारतासह चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांसाठीही हा मार्ग महत्त्वाचा आहे. तणाव वाढल्यास संकट ठरेल.
  • चटगाव व मतारबारी बंदरांमध्ये अमेरिकेला लॉजिस्टिक प्रवेश मिळाल्याने बंगालच्या उपसागरातून मलक्कापर्यंतच्या मार्गांवर अमेरिका प्रभावी देखरेख ठेवू शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *