Headlines

इलेक्ट्रिक, फ्लेक्स इंधनाच्या वाहनांना ग्राहकांची पसंती:नागपूरमध्ये 42.5 टक्के वाटा; दसऱ्याला नोंदणीत 10 टक्के वाढीचा अंदाज




नागपूरमध्ये इलेक्ट्रिक आणि फ्लेक्स इंधनावरील वाहनांना ग्राहकांची पसंती वाढत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये ग्रामीण (पूर्व) आरटीओमध्ये नोंदणी झालेल्या ८,६६१ वाहनांपैकी ९९७ इलेक्ट्रिक आणि २,६८७ फ्लेक्स इंधन/ई-२० वाहने होती. यांचा एकत्रित वाटा ४२.५ टक्के होता. यंदा दसऱ्याला नागपूर शहरात २,४०० ते २,५०० वाहनांची नोंदणी अपेक्षित आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे १० टक्के जास्त असेल. गेल्या दसऱ्याला एकूण ३,२०६ वाहनांची नोंदणी झाली होती. ऑक्टोबर २०२५ मधील नोंदणीत ७,१११ दुचाकी आणि १,५२९ मोटार कार होत्या. इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. १ जानेवारी ते ११ ऑक्टोबर २०२५ या काळात ३,४८६ इलेक्ट्रिक वाहने नोंदवली गेली. २०२६ मध्ये याच कालावधीत हा आकडा ५,४७४ वर पोहोचला, म्हणजेच सुमारे ५७ टक्के वाढ दिसून आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *