Headlines

मतदानाची सक्ती करा; मोदींकडे कायद्यासाठी आठवलेंचे साकडे:दिव्यांग, ज्येष्ठांसाठी घरपोच मतदानाची सूचना; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी फेटाळली




केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मतदान सक्तीचे करण्याची मागणी केली आहे. यासाठी कायदा करण्याची गरज असून, त्यांनी संसदेत निवेदन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही यासंदर्भात निवेदन दिल्याचे आठवले यांनी नागपूरमध्ये सांगितले. आठवले यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी घरपोच मतदानाची सुविधा देण्याची सूचना केली. त्यांना केंद्रापर्यंत जाण्याची अडचण येऊ नये, यासाठी ही व्यवस्था हवी. सीमेवरील सैनिक पोस्टाने मतदान करतात, तशीच ही सुविधा असावी, असेही त्यांनी सुचवले. मतदारयाद्यांच्या विशेष पुनरीक्षणावरुन (एसआयआर) विरोधकांकडून आक्षेप आहेत. आठवले यांनी निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेचे समर्थन केले. सुमारे १३ कोटी नावे वगळण्यामागे स्थलांतरित, मृत, बेपत्ता आणि दुबार मतदारांची नोंद ही कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राबवलेली प्रक्रिया योग्य आहे. विरोधकांच्या आंदोलनामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नसल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *