Headlines

Girls from red light areas are giving up child marriage and wages to appear for board exams


  • Marathi News
  • National
  • Girls From Red Light Areas Are Giving Up Child Marriage And Wages To Appear For Board Exams

बबिता माली | नैहाटी2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक
दर रविवारी येथे मुलींकडून वेगवेगळे उपक्रम करून घेतले जातात. - Divya Marathi

दर रविवारी येथे मुलींकडून वेगवेगळे उपक्रम करून घेतले जातात.

  • वड्या विकणाऱ्या कौशिक सिंघा यांनी सेक्स वर्कर्सच्या मुलांना दिली नवी दिशा
  • आठवड्यातून एकदा भरणाऱ्या क्लासने मुलींचे भविष्य आणि विचार बदलले

पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील नैहाटी येथील वस्त्यांमध्ये पूर्वी ५ वर्षांच्या होताच मुली शेतमजूर बनायच्या. बालविवाह, मजुरी व अनिश्चित भविष्य… एवढीच त्यांची दुनिया होती. आता मात्र त्याच मुली शाळेत जात आहेत, संगीत शिकत आहेत, तसेच योग व हस्तकलेच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करत आहेत. हा बदल ठाकूरपाडा रेडलाइट एरिया आणि भवागाछी गावात दिसत असून, तिथे ‘उडान नैहाटी’च्या रविवारच्या ‘ज्ञान पाठशाळे’ने क्रांती सुरू केली आहे. या संपूर्ण उपक्रमामागे डाळीच्या वड्या विकणारे ५० वर्षीय कौशिक सिंघा आहेत. १४ वर्षांपासून मुलांचे भविष्य घडवणारे सिंघा सांगतात, भवागाछीमध्ये प्रत्येक घरात ३ ते ४ मुली आहेत. आम्ही त्यांना स्वप्न पाहायला शिकवले. आज ३५ मुले येथे शिकत आहेत. २ मुलींनी यंदा १२ वीची परीक्षा दिली. दोन मुली पुढील वर्षी १० वीची परीक्षा देतील. २ विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरिंगचे प्रशिक्षण मिळाले आहे.

रेडलाइट एरियातून सरस्वतीची मूर्ती घडवण्यापर्यंतचा प्रवास

या बदलाची एक कहाणी २१ वर्षांच्या एका तरुणाची आहे, जो एका सेक्स वर्करचा मुलगा आहे. ज्याने कधी शाळा पाहिली नव्हती, आज तोच सरस्वतीची मूर्ती घडवतो आणि दरवर्षी त्याने बनवलेल्या मूर्तीची पूजा केली जाते. रांगोळी सजावटीपासून ते वेगवेगळ्या मूर्ती बनवण्यापर्यंत त्याने स्वतःचे जग स्वतः निर्माण केले आहे.

ठाकूरपाडा येथील मातांचीही विचारसरणी बदलत आहे

सुमारे १२ वर्षांपूर्वी जेव्हा आमची टीम ठाकूरपाडा रेडलाइट एरियात पोहोचली, तेव्हा लोकांचा विश्वास जिंकणे हे सर्वात मोठे आव्हान होते. कौशिक आठवून सांगतात, लोक मानायचे की ही मुले एक तर सेक्स वर्कर बनतील किंवा गुन्हेगार. आम्ही त्यांच्या मातांशी संवाद साधला, त्यांना विश्वास दिला आणि एका पत्र्याच्या शेडमधून क्लास सुरू केला.

आम्ही कधी मुलींच्या भविष्याचा विचारच केला नव्हता

आम्ही आमच्या मुलींच्या भविष्याचा कधी विचारच केला नव्हता. आज त्या शिकत आहेत, पुढे जात आहेत. त्या स्वतः पैसे मोजत आहेत. भिंतींवर लिहिलेल्या गोष्टी वाचत आहेत. हाच आमच्यासाठी सर्वात मोठा आनंद आहे.

– एक सेक्स वर्कर माता

रविवारी शिक्षण; व्यवस्था बंद असते, तेव्हा आशेचा किरण उगवतो

‘रविवार मॉडेल’ – चार लोकांची टीम येथे दर रविवारी ‘ज्ञान की पाठशाला’ चालवते. कौशिक म्हणतात, ही मुले त्यांच्या कुटुंबातील पहिलीच शिकणारी पिढी आहेत. येथे पुस्तकांसोबतच गाणे, योग यांसारख्या गोष्टी जोडल्या गेल्या आहेत, जेणेकरून मुलांना अभ्यासाची गोडी लागावी, भीती वाटू नये. अनेक मुलांना घरी सकस आहार मिळत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या पोषणाची काळजी घेतो. त्यांना अंडी व फळे दिली जातात, जेणेकरून भूक अभ्यासाच्या आड येणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *