![]()
महाराष्ट्र आणि देशामध्ये फोडाफोडीच्या राजकारणाला उत आलाच आहे. फोडा, तोडा, मोडा आणि राज्य करा असे सुरू आहे. आता नैतिकता, नीतिमत्ता काहीच राहिलेली नाही, कुठेही जावं, कुणाच्याही मांडीवर बसावं, कुणी कुणाला डोक्यावर घ्यावे अन् डोक्यावर घेत पायाखाली तुडवावे ही एक फॅशन झाली आहे, बघू पुढे काय होते ते, असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. देशात जे सरकार आहे त्यांच्या काळात देश कर्जबाजारी झाला आहे. जनता परेशान आहे. या परिस्थितीत फोडा फोडीचा विचार येणाऱ्यांना देव सदबुद्धी देईल. विजय वडेट्टीवार म्हणाले की, मतदारसंघातील कामांसाठी उबाठाचे खासदार सत्ताधाऱ्यांकडे जाऊ शकतात, सत्ता त्यांच्याकडे असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही सुद्धा जात असतो. मतदारसंघातील कामे असतात त्यासाठी जाण्यात गैर काय? उद्धव ठाकरे वेळ देत नाही हा केवळ आरोप आहे, आम्ही ज्या ज्या वेळी त्यांची वेळ मागितली त्यांनी आम्हाला भेटीसाठी वेळ दिली आहे. कोणाचे जेवन चांगले वाटले म्हणून खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेले असतील. यावर जास्त काही बोलणं योग्य नाही. पक्ष फुटण्याची काही चिन्ह आता तरी काही दिसत नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले की, एकनाथ शिंदे सत्तेत असूनसुद्धा अस्वस्थ आहेत. त्यांचे अनेक मंत्री अस्वस्थ आहेत. हे पाहता पुन्हा एकमेकांची तारीफ करत एकमेकांच्या जवळ येणं हे चांगले संकेत आहे असे मी मानतो. त्यांना वेगळ्या ॲंगलने पाहण्याची गरज नाही. राजकारण हे निवडणुकीपुरते असायला हवे. निवडणुकीनंतर भाजपच्या नगरसेवकाला जास्त आणि दुसऱ्या पक्षाच्या नगरसेवकांना कमी निधी असे महाराष्ट्रात असे कधीही झाले नाही. सरकारने सर्वांना विकासाच्या दृष्टीने मदत करण्याचा विचार केला आहे. पण आता ही नवीन पद्धत रुजली आहे की विरोधकांना पैसे द्यायचे नाही, त्यांच्या मतदारसंघाचा विकास करायचा नाही. विजय वडेट्टीवार म्हणाले की, काँग्रेसमध्ये काहीही मतभेद नाहीत. आम्ही सर्व जण एकमेकांच्या संपर्का असतो. बारामतीबद्दल सुद्धा प्रदेशाध्यक्षांनी दोन ते 3 वेळा फोन करत काय भूमिका घ्यावी या संदर्भात आमच्याशी चर्चा केली. मी पण त्यांना फोन केला की आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे. एकीकडे फोन करत विनंती करायची आणि दुसरीकडे विरोधी वक्तव्ये करायची याला काहीही अर्थ नाही. तुम्ही तुमच्या नेत्यांचा अपमान करत आहात. मुख्यमंत्र्यांनी आमच्या प्रदेशाध्यक्षांना विनंती केली म्हणून माघार केली.
Source link
फोडा, तोडा अन् राज्य करा हीच नवी फॅशन!:उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत हा निव्वळ आरोप, सत्ता असूनही एकनाथ शिंदे अस्वस्थ- विजय वडेट्टीवार