Headlines

सिटी बससाठी "जेबीएम' कंपनीची निवड केंद्र सरकारकडून:महापौर, स्थायी समिती सभापतींनी पत्रकार परिषद घेऊन ‘ग्रीननेक्सट’चा करार




येत्या १५ ऑगस्टपूर्वी शहरात बहुप्रतीक्षित ‘सिटी बस’ सेवा सुरू होणार असून यासाठी जेबीएम कंपनीसोबत केंद्र सरकारनेच करार केला आहे. नेक्सजेन ग्रीन मोबिलिटी प्रा. लि. ही कंपनी या कंपनीला जेबीएम कंपनीनेच नियुक्त केले आहे. मनपाचा करार हा जेबीएम कंपनीसोबतच असून सर्वस्वी जबाबदारी ही जेबीएमचीच आहे, अशी माहिती मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, महापौर शारदा खेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. विरोधी पक्षाने कचऱ्याच्या निविदेत २५० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. उर्वरित पान ४ तिकीट दर : प्रवाशांच्या सोयीसाठी तिकिटाचे दर टप्प्यांनुसार १० ते २० रुपये ठेवण्यात आले आहेत. ऑटो रिक्षा चालकांशी स्पर्धा करणे हा उद्देश नसून केवळ नागरिकांना स्वस्त सेवा देणे हा हेतू आहे. संयुक्त खाते : तिकिटातून मिळणारे उत्पन्न महापालिका आणि जेबीएम कंपनीच्या संयुक्त खात्यात जमा होईल, ते केवळ बसचा खर्च आणि कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी वापरले जाईल. अनुदान व तोटा : १२ मीटर बससाठी प्रति किमी ७० रुपये ९४ पैसे खर्च येणार असून केंद्र व राज्य सरकारकडून प्रत्येकी २२ ते २४ रुपये प्रति किलोमीटर अनुदान मिळेल. अनुदान वजा जाता होणारा तोटा महापालिका स्वतः भरेल, तर नफा झाल्यास तो महापालिकेच्या तिजोरीत जमा होईल. सिटी बससाठी स्वतंत्र निविदा का काढली नाही, याबाबत स्थायी समिती सभापतींनी सांगितले की, केंद्र सरकारने दिल्लीच्या जेबीएम कंपनीची थेट निवड केली आहे. पहिल्या टप्प्यात ९ मीटर लांबीच्या ९ बसेस व १२ मीटर लांबीच्या तीन बसेस शहरात दाखल होतील. या बस सेवेसाठी महापालिका केवळ कंडक्टर पुरवणार असून तिकीट छपाईचे काम करेल, तर ड्रायव्हर, बसेसची देखभाल-दुरुस्ती आणि खडकी येथील सर्व्हे नंबर २९/२ मध्ये उभारल्या जाणाऱ्या चार्जिंग स्टेशनच्या वीज बिलाचा खर्च जेबीएम कंपनी स्वतः करणार आहे. २० किमीपर्यंत विस्तार, परिवहन समितीची केली जाईल स्थापना पहाटेपासून सेवा व मार्ग : नोकरदार व एमआयडीसीतील कामगारांच्या शिफ्टनुसार ही बस सेवा सकाळी ४ वाजेपासून सुरू राहील. शहराच्या हद्दीपासून पुढे २० किलोमीटरपर्यंत (एमआयडीसी, भरत, गायगाव) बस चालवण्याची परवानगी आरटीओकडे मागणार आहे. नवी परिवहन समिती : बस सेवेच्या आर्थिक व्यवस्थापनासाठी एक ‘परिवहन समिती’ स्थापन केली जाईल. यात शहर सुधार आघाडीचे ७, काँग्रेसचे ३ आणि ठाकरे गटाचा एक सदस्य असेल. बसचा खर्च भागवण्यासाठी तिकीट विक्रीसह मोबाइल ॲप, बसेस आणि बस थांब्यांवर व्यावसायिक जाहिरातींद्वारे उत्पन्न मिळवण्याचे नियोजन ही समिती करेल. खर्च, उत्पन्न व तिकीट दराचे गणित



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *