Headlines

स्मार्ट घड्याळे, कुंदन दागिने अन् सुशोभित भेटवस्तूंची भूरळ:ग्राहकांच्या पसंतीनुसार बनवलेल्या वस्तूंना मागणी, 500 ते 1,500 रुपयांच्या गिफ्ट संचांना पसंती‎




प्रतिनिधी | अहिल्यानगर रक्षाबंधनानिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिला व युवतींची मोठी गर्दी दिसत आहे. यंदाच्या सणावर आधुनिक तंत्रज्ञान आणि नवीन डिझाईन्सचा मोठा प्रभाव दिसून येत असून, पारंपरिक मिठाई आणि राख्यांसोबतच डिजिटल व ग्राहकांच्या पसंतीनुसार खास बनवून घेतलेल्या भेटवस्तूंची जोरदार विक्री सुरू आहे. अहिल्यानगरची बाजारपेठ नव्या ट्रेंडने सजली आहे. यंदा ग्राहकांचा कल पाचशे ते दीड हजार रुपयांच्या किंमत मर्यादेतील खास बनवलेले भेटवस्तूंचे संच आणि त्वचेच्या काळजीसाठीच्या सौंदर्यप्रसाधनांच्या किटकडे जास्त आहे. शहरातील चौपाटी कारंजा, कापड बाजार आणि प्रोफेसर कॉलनी परिसरातील दुकानांमध्ये खरेदीचा उत्साह आहे. परगावी शिक्षण किंवा नोकरीनिमित्त असलेल्या भावांसाठी स्थानिक दुकानांतून नाव कोरलेले संच मागवून ते ऑनलाईन पैसे भरून थेट घरपोच पाठवण्याकडे बहिणींचा मोठा कल दिसत आहे. बाजारात १५० रुपयांच्या अल्पबजेट भेटवस्तूंच्या संचापासून ते ५ हजार रुपयांपर्यंतच्या नामांकित कंपन्यांच्या उच्च दर्जाच्या वस्तू उपलब्ध आहेत. ग्राहकांचा सर्वाधिक प्रतिसाद ५०० ते दीड हजार रुपये या मध्यम बजेटमधील वस्तूंच्या संचाला मिळत आहे, असे विक्रेत्यांनी सांगितले. या भेटवस्तूंना मागणी { बहिणींसाठी खास: ऑक्सिडाइज्ड व कुंदन दागिने संच, ट्रेंडी हँडबॅग्ज, सौंदर्यप्रसाधने व त्वचेच्या काळजीचे संच. { इतर: चॉकलेट संच, फोटो फ्रेम, नाव छापलेले मग आणि गृहउद्योग निर्मित वस्तू. { भावांसाठी खास: स्मार्टवॉच, वायरलेस हेडफोन्स, लेदर पाकीट, नाव कोरलेला लेखणी-वही संच. ^दरवर्षी बहिणीला काय भेट द्यायची हा प्रश्न असतो. यंदा तिच्या आवडीनुसार सौंदर्यप्रसाधने आणि नवीन धाटणीची हँडबॅग देण्याचे ठरवले आहे. बाजारात बजेटनुसार उत्तम पर्याय उपलब्ध असल्याने कुंदन दागिनेही देणार आहे. – अक्षय काळे, अहिल्यानगर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *