![]()
फुलंब्री शहरामधील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात धर्मवीर संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असे निवेदन आमदार सुहास शिरसाट यांनी सोमवार रोजी मुंबई येथे मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना दिल
.
फुलंब्री शहरामध्ये विविध महापुरुषांचे पुतळे उभारावे, यासाठी सुहास शिरसाट यांनी अनेक वेळा पुढाकार घेतला आहे. फुलंब्री शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले यांचे पुतळे उभारण्यात आले आहे. आता पुन्हा त्यांनी शासकीय विश्रामगृहातील परिसरामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी दिलेल्या निवेदनात व बांधकाम मंत्र्यांसोबत झालेल्या सकारात्मक चर्चेने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सुहास शिरसाट हे विधान परिषदेचे आमदार झाल्यानंतर त्यांनी विकासाची पावले उचलत फुलंब्री तालुक्यात कशाप्रकारे विकास करता येईल यासाठी मोठे प्रयत्न ते करत आहेत.
सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या भेटी दरम्यान त्यांनी फुलंब्री येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृह परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. फुलंब्री हे शहर छत्रपती संभाजीनगर–जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर असून तेथून अजिंठा या जागतिक वारसा स्थळाकडे देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने प्रवास करतात. या मुख्य मार्गावरील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात पुतळा उभारल्यास पर्यटकांसाठी ते एक मोठे प्रेरणास्थान ठरेल.