![]()
आगामी विधान परिषद निवडणुका आणि राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातून महत्त्वाची राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. पुणे शिक्षक मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना शिवसेनेचा अधिकृत पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, शेतकऱ्यांच्या मदतीवरून राजकारण करणाऱ्या विरोधकांनाही त्यांनी यावेळी खडेबोल सुनावले. महायुतीच्या विजयाचा ठाम विश्वास पुण्यातील एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकांवर भाष्य केले. ते म्हणाले की, “काही अपवाद वगळता आम्ही या निवडणुका महायुती म्हणूनच लढवत आहोत. पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे.” यावेळी बोलताना त्यांनी महायुती विधान परिषदेच्या पाचही जागा निश्चितपणे जिंकेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. ‘5 हजार ही केवळ अग्रिम (आगाऊ) मदत’ शेतकऱ्यांना दिलेल्या 5 हजार रुपयांच्या मदतीबाबत स्पष्टीकरण देताना शिंदे म्हणाले की, “ही रक्कम केवळ ‘अग्रिम’ (आगाऊ) मदत म्हणून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यंदा दुष्काळाचे संकट मोठे असून, मुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांनी थेट बांधावर जाऊन पाहणी केल्यानंतर तत्काळ दुष्काळ जाहीर केला आहे. सरकार कुठेही हात आखडता घेणार नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्य आणि केंद्राने मिळून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आश्वस्त केले आहे.” यावेळी त्यांनी शिवसैनिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही मदतीचे आवाहन केले. नवरात्रोत्सवाचा खर्च कमी करून पुण्यातील नाना भानगिरे आणि आबा बागुल यांनी शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळी किट वाटपाचा जो उपक्रम सुरू केला आहे, तशाच प्रकारची मदत शिवसेनेच्या वतीने राज्यभर केली जाईल, असेही ते म्हणाले. ‘शेतकरी संकटात असताना राजकारण नको’ विरोधकांच्या टीकेवर संताप व्यक्त करत शिंदे यांनी सुनावले की, “विरोधकांनी आधी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली, आता जाहीर केल्यावर त्यावरही ते टीका करत आहेत. ५ हजारांची अग्रिम मदत दिली, त्यावरही त्यांचे राजकारण सुरूच आहे. आरोप करायला आणि टीका करायला अनेक संधी मिळतील, पण सध्या शेतकरी मोठ्या संकटात आहे. अशावेळी राजकारण बाजूला ठेवून सर्वांनी बळीराजाच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे.” ——————– ही बातमी पण वाचा.. विरोधकांचा हिंदुत्वविरोधी अजेंडा: आरक्षणाच्या नावाने समाजा-समाजांत तेढ निर्माण करण्याचा डाव- चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या विरोधात सुरू असलेल्या विरोधकांच्या आंदोलनावर आणि विधान परिषद निवडणुकीतील महायुतीच्या सद्यस्थितीवर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सविस्तर भाष्य केले आहे. सत्तेबाहेर फेकले गेल्याने विरोधक पिसाळले असून, देशात अराजकता निर्माण करण्याचा त्यांचा डाव असल्याचा घणाघाती आरोप बावनकुळे यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link
पुण्यात शिवसेनेचा सचिन सानप यांना पाठिंबा:एकनाथ शिंदे म्हणाले- महायुती विधान परिषदेच्या पाचही जागा जिंकेल, दुष्काळी मदतीवरून विरोधकांना टोला