Headlines

फोटोग्राफी प्रेमींसाठी सुवर्णसंधी!:कर्णपुरा यात्रेत फोटोवॉक स्पर्धा, क्रांती चौकात प्रदर्शन; औरंगाबाद फोटोग्राफर्स असोसिएशनचा उपक्रम




कर्णपुरा यात्रेतील रंग, परंपरा, श्रद्धा आणि जनजीवन टिपण्याची संधी छायाचित्रकारांना उपलब्ध करून देण्यासाठी ‘औरंगाबाद फोटोग्राफर्स असोसिएशन’ व ‘कलर्स ऑफ संभाजीनगर’ यांच्या संयुक्त विद्यमाने फोटोवॉकचे आयोजन करण्यात आले आहे. छायाचित्रकारांना एकत्र आणणे, त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे आणि यात्रेचे सुंदर दस्तऐवजीकरण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. औरंगाबाद फोटोग्राफर्स असोसिएशनतर्फे फोटोवॉकचा तपशील: विषय: पोर्ट्रेट, हॅपिनेस आणि स्पीड. दिनांक व वेळ: शनिवार, 17 ऑक्टोबर 2026 (संध्याकाळी 5 ते रात्री 8). ठिकाण: कर्णपुरा यात्रा परिसर. नियम: फोटोवॉकमध्ये फक्त कॅमेऱ्याने काढलेले फोटोच ग्राह्य धरले जातील. सर्वांसाठी मोफतः फोटोवॉक सर्वांसाठी मोफत, व्यावसायिक तसेच हौशी छायाचित्रकारांसाठीही खुला. स्पर्धा व प्रदर्शन: या फोटोवॉकमध्ये काढलेल्या निवडक छायाचित्रांची स्पर्धा व प्रदर्शन मंगळवार, 20 ऑक्टोबर 2026 रोजी क्रांती चौकातील उड्डाणपुलाखाली सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 20 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता महापौर समीर राजूरकर, महानगरपालिका आयुक्त अमोल येडगे आणि पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते छायाचित्रांचे परीक्षण करण्याचा नवा प्रयोग असोसिएशनतर्फे केला जाणार आहे. विशेष पुरस्कार व आवाहन: नवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगरमधील व्यावसायिक महिला छायाचित्रकारांचा “नारीशक्ती महिला छायाचित्रकार सन्मान” पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. या संधीचा सर्व छायाचित्रकार व प्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन असोसिएशनचे अध्यक्ष किशोर निकम, ऋषिकेश होशीग, ज्ञानेश्वर पाटील, विजय लकडे, राजेश गोकलानी, संकेत कुलकर्णी, सतीश साखरे, आकाश पारख, सागर सोनार व सुनील पांडे यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी महावीर अल्बम, एसएस मोबाईल, विकी कॅमेरा शॉप आणि रोटरी क्लब वेस्ट यांचे सहकार्य लाभले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *