![]()
पाचोड भंगार घेऊन जाणाऱ्या आयशरने समोरील ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने आयशर चालकाचा मृत्यू झाला. ही दुर्घटना धुळे-सोलापूर महामार्गावर मुरमा शिवारात सोमवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, अपघात घडताच आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी आयशर चालकाला बाहेर काढून रुग्णवाहकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र गंभीर मार लागल्याने उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाला. आसेफ महेमूद बेग (३०, रा. बसवंतनगर, लातूर) असे मृत चालकाचे नाव आहे. आसेफ बेग हा आपल्या मालकीच्या आयशरमध्ये (एमएच ३८ एक्स २१४७) भंगार भरून बीड येथून छत्रपती संभाजीनगरकडे घेऊन येत होता. दरम्यान, मुरमा (ता. पैठण) शिवारात येताच आयशरच्या समोर चाललेल्या ट्रकच्या (जीजे ०३ यूव्ही ८२५३) चालकाने पाठीमागील वाहनाचा अंदाज न घेता अचानक एका ढाब्यावर थांबण्यासाठी वळण घेतल्याने काही समजण्याच्या आतच पाठीमागील आयशर ट्रकला जोरदार पाठीमागून धडकली. ही धडक इतकी भीषण होती की आयशरच्या समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत चालक आसेफ बेगच्या डोक्याला हातपायला जबर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटीत नेले असता या वेळी उपच्यादरम्यान त्याचा मध्यरात्री मृत्यू झाला. पाचोड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.तसेच ट्रकचालकाला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणे ट्रक चालवून अपघात मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसेफ बेग
Source link
ट्रकने अचानक वळण घेतल्याने आयशरची धडक; चालकाचा मृत्यू:धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुरमा येथील घटना, अर्धा तास वाहतूक ठप्प