![]()
प्रतिनिधी | इगतपुरी शहरातील राम मंदिर परिसरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. याप्रकरणी एका दुकानदाराविरुद्ध इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल के ला आहे. अन्न सुरक्षा अधिकारी सुहास जिभाऊ मंडलिक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल महादू कडू (३६, रा. नेहरू चौक, इगतपुरी) याच्याविरोधात कारवाई करण्यात आली. शुक्रवारी राम मंदिराजवळील एका पानटपरीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा सुमारे ५ हजार ६२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तपासात आरोपीने महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार विक्रीस बंदी असलेल्या पदार्थांचा विक्रीसाठी साठा करून ठेवल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल गायधनी, उपनिरीक्षक कांचन भोजने, निलेश देवराज आणि विजय रुद्रे करीत आहेत. इगतपुरीत गुटखा,पानमसाला साठा जप्त करताना पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव , उपनिरीक्षक अमोल गायधनी आदी.
Source link
इगतपुरीत प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याचा साठा जप्त:एका दुकानदाराविरुद्ध इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल