Headlines

अकोल्यात पत्नीचा चाकूने भोसकून खून;‎ 2 चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले‎:‘मुलाला मारू नका'' म्हणून आईमध्ये पडली अन् गेला जीव‎




येथून जवळच असलेल्या बोरगाव‎ मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ‎‎यावलखेड येथे गुरुवारी सकाळी ‎‎‎घडलेल्या ‎‎‎धक्कादायक ‎‎‎घटनेत पतीने ‎‎‎कौटुंबिक‎‎ वादातून‎‎ पत्नीवर ‎‎धारदार शस्त्राने ‎‎‎हल्ला करून‎ तिची हत्या केल्याची घटना‎ उघडकीस आली. या घटनेमुळे ‎‎परिसरात मोठी खळबळ उडाली ‎‎असून, दोन लहान मुलांचे मातृछत्र ‎‎हरपले आहे. शहरातील डाबकी‎रोड पोलिस ठाणे हद्दीत अन्नपूर्णा‎माता मंदिर परिसरात पतीने ‎पत्नीचा खून करुन जाळून ‎टाकण्याची घटना ताजी‎ असतानाच गेल्या तीन दिवसांत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची ‎हत्या करण्याची गुरुवारी घडलेली‎ही दुसरी घटना आहे. यामुळे ‎जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली ‎जात आहे.‎ याबाबत दीपक लक्ष्मण‎ पिंजरकर यांनी बोरगाव मंजू ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत‎ म्हटले आहे की, मृत महिलेचे नाव‎ वृषाली अनिल निंबोकार ‎(32),रा. गजानन नगर‎ यावलखेड, ता. अकोला असून,‎ती यावलखेड येथील गायत्री ‎ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स कंपनीत‎ कामाला होती. पती अनिल ‎निंबोकार (42), सासरे व प्रथमेश ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎उर्फ समर्थ व कार्तिक या दोन ‎मुलांसह गायत्री ऑरगॅनिक ‎प्रॉडक्ट्स कंपनीच्या समोरील‎ बाजूच्या गजानन नगर,‎ यावलखेडमध्येच मागील दोन ‎वर्षांपासून राहत होते. वृषाली व‎ अनिल निंबोकार या‎पती-पत्नीमध्ये नेहमीच कौटुंबिक‎वाद होत असत. गुरुवारी सकाळी‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सुमारे 9.15 ते 9.30 च्या सुमारास‎पती मोठा मुलगा समर्थ याला मारत ‎होते. ‘मुलाला मारू नका म्हणून‎ आईमध्ये पडली त्यामुळे पतीचा ‎राग अनावर झाला. या वादाचे ‎रूपांतर हिंसाचारात झाले आणि‎ अनिल निंबोकार याने वृषालीवर ‎चाकूने सपासप वार केले.‎ घटनेदरम्यान घराचा दरवाजा आतून बंद‎ होता. शेजाऱ्यांनी दरवाजा ‎उघडून आत प्रवेश केला आणि‎ त्यांनी आरोपीला साडीने बांधून‎ ताब्यात ठेवण्यात आले. जखमी ‎अवस्थेतील वृषालीला तातडीने‎ येथील शासकीय ‎रुग्णालयात नेण्यात आले.‎ मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले. या‎प्रकरणी बोरगाव मंजू पोलिस‎ ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात‎ आला असून, आरोपी अनिल ‎निंबोकार (42) यास अटक ‎केली आहे. अकोला स्थानिक ‎गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक ‎शंकर शेळके यांच्यासह‎ बोरगाव मंजूचे प्रभारी ठाणेदार ‎पोलिस उपनिरीक्षक अजित ‎जाधव, पोलिस उपनिरीक्षक ‎मनोज उघडे, पोलिस‎ उपनिरीक्षक रवींद्र धुळे, हेड ‎कॉन्स्टेबल आकाश यादव,‎ सुदिप राऊत, प्रशांत विधळे,‎अक्षय देशमुख, शिवहरी‎ लांडगे तपास करत आहेत. या‎ घटनेमुळे यावलखेड परिसरात ‎भीती आणि संतापाचे ‎वातावरण निर्माण झाले आहे.‎ आईला मारत असताना ‎मुलगा होता रडत‎ घरातून आरडाओरडा ऐकू येत‎ असताना मोठा मुलगा प्रथमेश उर्फ‎ समर्थ ‘बाबा आईला मारत आहेत’‎अशी हाक मारत बाहेर आला.‎ शेजाऱ्यांनी दरवाजा उघडण्याचा ‎प्रयत्न केला. दरवाजा ‎उघडल्यानंतर वृषाली रक्ताच्या‎ थारोळ्यात पडलेली दिसली, तर‎ अनिलच्या हातात चाकू होता.‎शेजाऱ्यांनी तत्काळ अनिलला ‎पकडून त्याच्या हातातील चाकू‎ काढून घेतला. त्याने त्यानंतर ‎विषारी कीटकनाशक पिण्याचा‎ प्रयत्न केला, मात्र उपस्थितांनी तो‎ प्रयत्न हाणून पाडला.‎ जिल्ह्यात आठवडाभरात गुन्हेगारी घटना वाढल्या‎ शहरासह जिल्ह्यात सर्वच ‎भागांमध्ये गुन्हेगारीने डोके वर‎ काढले असून, गेल्या 1 ते 9‎ एप्रिल या नऊ दिवसांत जिल्ह्यात कौटुंबिक वादातून दोन खून, दोन ‎जबर हाणामाऱ्या, एक आर्थिक ‎फसवणूक, दोन महिला‎ अत्याचाराच्या घटना घडल्या.‎ बाळापूर पोलिस ठाणे हद्दीत 112‎ किलो गांजा सापडला. गेल्या ‎आठवडाभरातील विविध‎ प्रकारच्या घटना पाहता ‎जिल्ह्याचा क्राइम रेट वाढल्याचे ‎दिसून येत आहे. शहरातील‎ गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने‎ वाढ होत असताना पुन्हा एकदा ‎थरारक हत्याकांड उघडकीस‎ आले आहे. अकोला शहरात‎ गावगुंडांची वाढती दहशत, लहान‎ सहान घटनांवरून निघणारे चाकू,‎ सुरे पाहता तसेच गांजाच्या ‎आहारी गेलेले अल्पवयीन‎ गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नांग्या‎ कायमच्या ठेचण्याची वेळ आली‎ आहे. पोलिस प्रशासनाने या सर्व‎ प्रकरणांची गंभीर दखल घेण्याची ‎गरज निर्माण झाल्याचा सूर‎ जनतेतून उमटत आहे.‎



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *