Headlines

समाजात शिक्षकांचे योगदान सर्वात महत्त्वपूर्ण:संजीवनीचे माजी विद्यार्थी हेच या संस्कारांचे जिवंत उदाहरण- आमदार विवेक कोल्हे




प्रतिनिधी |कोपरगाव इंजिनिअर चुकला तर त्याचे बांधकाम बाधित होईल, डॉक्टर चुकला तर रुग्ण दगावू शकतो; पण जर शिक्षक चुकला तर संपूर्ण पिढी बरबाद होऊ शकते. म्हणूनच समाजात शिक्षकांचे योगदान सर्वात महत्त्वपूर्ण आहे. संजीवनीचे शिक्षक खऱ्या अर्थाने उत्तम काम करत असून आज जगभरात यशस्वी असलेले संजीवनीचे माजी विद्यार्थी हेच या संस्कारांचे जिवंत उदाहरण आहेत, असे प्रतिपादन आमदार विवेक कोल्हे यांनी केले. विधान परिषदेवर निवड झाल्याबद्दल संजीवनी युनिव्हर्सिटी व संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे आणि चीफ टेक्निकल ऑफिसर विजय नायडू उपस्थित होते. संजीवनी समुहाचे अध्यक्ष नितीन कोल्हे म्हणाले, विवेक कोल्हे यांची आमदार म्हणून झालेली निवड ही विकास, शिक्षण आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या नेतृत्वाची पावती आहे. अमित कोल्हे म्हणाले, विवेक कोल्हे यांची ‘मेरिट’वर झालेली निवड संपूर्ण संजीवनी परिवारासाठी अभिमानास्पद आहे. आमदार कोल्हे यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेला अधिक ऊर्जित अवस्थेत आणावे, हीच अपेक्षा आहे. सत्काराला उत्तर देताना आमदार कोल्हे म्हणाले, स्व. शंकरराव कोल्हे यांनी तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचे स्वप्न पाहिले होते. माझे कार्यक्षेत्र आता संपूर्ण महाराष्ट्र आहे. त्यामुळे सभागृहात राज्यातील शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी मी माझे सर्वोत्तम योगदान देईन.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *