![]()
विद्यार्थ्यांच्या आंदोलनासमोर केंद्र सरकारलाही झुकावे लागले आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. याच पार्श्वभूमीवर मुंबईत ठाकरे बंधूंची जल्लोष सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा मुंबियाच्या सावरकर मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह दोन्ही पक्षातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या जल्लोष सभेत उपस्थित असणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडून तरुणांना सभेसाठी येण्यासाठी आवाहन दिल्लीत महिनाभरापासून कॉक्रोच जनता पार्टीसह देशभरातील लाखो विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले होते. त्यात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी देखील 20 दिवस उपोषण केले होते. त्यानंतर त्यांना पोलिसांनी बाळाचा वापर करत उचलून नेले होते. या घटनेनंतर विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी चलो संसद मोर्चा काढला, या मोर्चावर पोलिसांनी लाठी चार्ज केला होता. यानंतर देखील विद्यार्थ्यांनी कशालाही न जुमानता आपले आंदोलन सुरूच ठेवले. याचा परिणाम म्हणजे केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.
Source link
मुंबईत ठाकरेंची जल्लोष सभा:उद्धव व राज ठाकरे संबोधित करणार; काय बोलणार याकडे असणार लक्ष