![]()
येथील इंद्रराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने दत्तक घेतलेल्या वरुड (खुर्द) येथे एकदिवसीय वृक्षलागवड शिबिरात वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. चंद्रशेखर काळे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. या वेळी विविध प्रकारच्या पर्यावरणपूरक, स्थानिक प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. गावातील परिसर, ग्रामपंचायत परिसर, गावातील जिल्हा परिषद शाळेचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. संवर्धनासाठी जाळीचे कुंपण करण्यात आले. पाण्याची व्यवस्थाही करून देण्यात आली. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुदत्त राजपूत यांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व स्पष्ट केले. वृक्षारोपण करणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच लावलेल्या वृक्षांचे संगोपन करणेही आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. वृक्षारोपण शिबिरामध्ये डॉ. व्यंकटेश लांब, गावाचे सरपंच दीपक कळम, उपसरपंच गुलाब मिरगे, गावचे पोलिस पाटील सारंगधर थोरात, रतन पंडित, ज्ञानेश्वर मिरगे, भगवान थोरात, गावातील शाळेतील शिक्षक, नागरिक आदी उपस्थित होते. या शिबिराच्या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती करण्यात आली. वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वयंसेवकांनी स्वीकारली. या वृक्षलागवड शिबिराला संस्थेचे सचिव अशोक देवरे यांनी शुभेच्छा दिल्या. या शिबिरासाठी महाविद्यालयातील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, रासेयो स्वयंसेवक, ग्रामस्थ यांचे सहकार्य मिळाले. डॉ. प्रीतम मुळे, डॉ. रूपाली बिरादार, डॉ. विनोद शेळके, डॉ. जितेंद्रसिंग पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
Source link
वरूड येथे एकदिवसीय वृक्ष लागवड शिबिर:सिल्लोड येथील इंद्रराज महाविद्यालयाचा उपक्रम, ग्रामस्थांत पर्यावरण जनजागृती