![]()
पैठण शहरातील प्रथम मानाच्या आणि तब्बल ८५ वर्षांची परंपरा लाभलेल्या कापड मंडई गणेश मंडळाच्या गणेशमूर्तीचे सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत स्वागत करण्यात आले. शिवाजी पुतळ्यापासून कापड मंडईपर्यंत मिरवणूक काढून विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. माज
.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष गौरव आठवले यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत गणरायाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर धार्मिक विधी पार पाडत गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
माजी राज्यमंत्री अनिल पटेल म्हणाले, “हरितालिका तीज, सोमवार आणि गणेश चतुर्थी असा आजचा त्रिवेणी संगम आहे. कापड मंडई गणेश मंडळाची मूर्ती श्रीकृष्ण रूपातील गणेश भगवान आणि महादेवाच्या पिंडीचे अनोखे स्वरूप दर्शवणारी आहे. मोबाइल आणि एआयच्या युगातही मंडळाच्या तरुण पिढीने ८५ वर्षांची गणेशोत्सवाची अखंड परंपरा कायम ठेवली आहे, ही कौतुकाची बाब आहे.” प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी एकनाथ मोरे, मारुती गमे, उदय भारत गणेश मंडळाचे अध्यक्ष रवींद्र पांजवले, अॅड. विशाल बुरकुळे, अमित पटेल, पीयूष पटेल, रितेश पटेल, दिनेश माळवे, सोमनाथ दारुणकर, सागर जटाले, सूरज वाकोडे, विशाल शिरसाठ, समीर आठवले, गणेश अंदुरे, रोहित आवारे, पंकज गुजर, हरिओम वैष्णव उपस्थित होते.